मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'न्यूयॉर्कमधील डब्बेवाली', आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट फोटो; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाउस

'न्यूयॉर्कमधील डब्बेवाली', आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट फोटो; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाउस

आनंद महिंद्रा यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. न्यूयॉर्कमधील (New York) हा फोटो आहे. त्या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत

आनंद महिंद्रा यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. न्यूयॉर्कमधील (New York) हा फोटो आहे. त्या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत

आनंद महिंद्रा यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. न्यूयॉर्कमधील (New York) हा फोटो आहे. त्या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : भारतातील पेहरावाची विशिष्ट पद्धत किंवा एखादी भारतीय भाषा बोलणारं कुणी परदेशात दिसलं, तर त्याचं आपल्याला नेहमीच अप्रूप वाटतं. आपण त्याची चर्चा करतो किंवा ते समजेल अशा व्यक्तीला ती गोष्ट सांगतो. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे (Mahindra Group) चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना अशीच एक बाब लक्षात आली आणि त्यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. न्यूयॉर्कमधील (New York) हा फोटो आहे. नेटिझन्सनी त्या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया (Comments) दिल्या आहेत

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. लोकांच्या मदतीला धावून जातात. सतत नवनवीन काहीतरी शेअर करत असतात. चांगलं काहीतरी करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देतात. तसंच अनेकदा त्याच्या ट्विटर हँडलवर (Twitter Handle) खूप मनोरंजक गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात. अशा पोस्ट लोकांना खूप आवडतात. अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी न्यूयॉर्कमध्ये क्लिक केलेला एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फायर स्टंट बेतला जीवावर! आगीच्या विळख्यात कराटे मास्टरचा मृत्यू; Shocking video

या फोटोमध्ये एक स्थानिक महिला न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये (Central Park) चालताना दिसत आहे. फोटो पाठीमागून काढला असल्याने त्या महिलेचा चेहरा दिसत नाही. फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की, ती महिला कदाचित ऑफिसला चालली असावी. मात्र या फोटोमध्ये असणारी विशेष बाब म्हणजे त्या महिलेच्या उजव्या हातात स्टेलनेस स्टीलचा (Stainless Steel) जेवणाचा डबा (Tiffin Box) आहे. परदेशात अशा पद्धतीने स्टीलचा डब्बा घेऊन जाताना फारसं कोणी दिसत नाही. हीच बाब भारतीय लोकांना फार भावली आहे.

भारतातील असं गाव जिथं एकही कोविड रुग्ण नाही; कोरोना पोहोचूच शकत नाही कारण...

भारतामध्ये ऑफिसला जाताना दुपारच्या जेवणासाठी घरून स्टेनलेस स्टीलचा डबा घेऊन जाणं हे अगदी कॉमन आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अधिकतर लोक स्टीलचे डबे वापरतात. पण अमेरिकेसारख्या प्रगत देशात न्यूयॉर्कमधील महिला सुद्धा स्टीलचा डबा घेऊन ऑफिसला जातानाचा हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसंच हे पाहून लोकांना सुखद धक्का सुद्धा बसला आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये महिंद्रा यांनी लिहिलंय, की 'न्यूयॉर्क, सेंट्रल पार्क. डब्बा वाली.' त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. तसंच लोकांनी स्टीलच्या डब्ब्याशी संबंधित त्यांच्या अनेक आठवणीही शेअर केल्या आहेत.

First published:

Tags: Anand mahindra