मुंबई, 08 नोव्हेंबर : लग्नाच्या वरातीतील डान्सचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असे किती तरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. अशाच लग्नाच्या वरातीतील डान्सचा हा एक विचित्र व्हिडीओ आहे. एका तरुणाने इतका भन्नाट डान्स केला आहे की त्याचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक डान्समधून काही ना काही व्यक्त केलं जातं. प्रत्येक डान्स काहीतरी सांगत असतो. मग तो नागिण डान्स का असेना. नागिण डान्समधून सापाचं नृत्य दाखवलं जातं. या व्हिडीओतील तरुणही आपल्या डान्समधून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने डान्स करता करता जे सांगितलं आहे, ते पाहून तुम्हाला मात्र तुमचं हसू बिलकुल आवरणार नाही. व्हिडीओत तुम्ही पाहिला तर एखाद्या लग्नाच्या वरातीचं हे दृश्य दिसतं आहे. ढोल वाजत आहेत. त्याच्या तालावर एका बाजूला काही महिला नाचत आहे. तर ढोलवाल्यांच्या समोर एक व्यक्ती एकटीच डान्स करते आहे. या व्यक्तीचा डान्स सर्वांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळेच या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हे वाचा - VIDEO - अतिउत्साह पडला महागात! एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत असं काही केलं की मास्तरांनी चोप चोप चोपलं व्हिडीओ नीट पाहिलात तर सुरुवातीला ही व्यक्ती हातांनी काहीतरी कृती करताना दिसते. हातात काहीतरी धरल्यासारखं ती दाखवते. त्यानंतर तोच हात वाकडा करून काहीतरी ओतल्यासारखं दाखवते. त्यानंतर पोटावरून हात फिरवत, ती व्यक्ती विचित्र अंगात संचारल्यासारखं करते आणि शेवटी उलटी करताना दिसते. एकंदर प्रक्रिया पाहिल्यानंतर व्यक्तीचं कृत्य पाहताच दारूड्याची आठवण नक्कीच झाली असावी. कारण खरंतर ही व्यक्ती डान्स करता करता दारू पिणाऱ्याचीच अवस्था दाखवते आहे. ज्यात ही व्यक्ती हातात दारूची बाटली धरल्यासारखं करते. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील उत्साहही दारू पिणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच आहे. ती बाटली ग्लासात ओतते आणि तो ग्लास गटागटा पिते. त्यानंतर दारू शरीरात जाते आणि मग त्या व्यक्तीला ती दारू चढते आणि ती आऊट ऑफ कंट्रोल होते. शेवटी दारू तिच्या शरीरातून उलटीच्या रूपाने बाहेर पडते. हे वाचा - VIDEO - ती ढसाढसा रडत होती तरी तिचे हातपाय धरून तिला…; नवरीसोबत मंडपात धक्कादायक प्रकार डान्स करता करता पेग बनवण्यापासून उलटी करण्यापर्यंतची प्रोसेस ही व्यक्ती अशा पद्धतीने दाखवते जणू ती यातील चांगलीच अनुभवी असल्याचं दिसतं. काहीच न बोलता, दारू न पिता या व्यक्तीने दारूड्यांच्या मन की बात सांगितली आहे. दारू पिण्यापासून ते दारू प्यायल्यानंतर काय काय होतं ही संपूर्ण प्रक्रिया त्याने डान्समधून सांगितली आहे. फक्त दारू पिणाऱ्यांनाच नाही तर न पिणाऱ्यांसुद्धा त्या व्यक्तीला नेमकं काय सांगायचं आहे, ते समजतं.
ansh.parashar_13 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.