जपान, 03 जून: बाळाचा जन्म होणं ही आनंदाची बाब असते. पण एखाद्या गावात तब्बल 18 वर्षांपासून एकाही बाळाचा जन्म झालेला नाही, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. या गावात 18 वर्षांपासून एकाही बाळाचा जन्म झालेला नाही, त्यामुळे या या ठिकाणाला निपुत्रिक गाव (Childless Village) असंही म्हणतात. हे गाव जपानमध्ये आहे. जपानच्या टोकुशिमा (Tokushima) राज्यातील शिकोकू बेटावर (Shikoku Island) नागोरो नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणाला निपुत्रिक गाव म्हणतात. इथं परत गेल्यावर एका बाईला एकटेपणाचा इतका त्रास झाला की तिने शेकडो मोठमोठ्या बाहुल्या तयार करून घेऊन त्या गावात ठेवल्या. त्यामुळे हे ठिकाण आता डॉल्स व्हिलेज (Dolls Village) म्हणून ओळखलं जाते. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. ‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, या महिलेचं नाव अयानो त्सुकिमी आहे. नागोरो नावाच्या या गावात 30 पेक्षा कमी लोक राहतात. अयानो या गावात आल्यावर तिला जाणवलं की या गावात लोक नाहीत. जे आहेत ते फक्त वृद्ध उरलेत. गेल्या 18 वर्षांपासून येथे एकाही मुलाचा जन्म झाला नाही. त्यामुळे गावात लहान मूल किंवा तरुण दिसत नाहीत. अशा परिस्थितीत घटत्या लोकसंख्येचा त्रास दूर करण्यासाठी महिलेने मोठमोठ्या आकाराच्या बाहुल्या बनवण्यास सुरुवात केली. ED नं राहुल गांधींना दिली नवीन तारीख, आता चौकशीसाठी बोलावलं ‘या’ तारखेला अयानो त्सुकिमीने आतापर्यंत 350 बाहुल्या हाताने (handmade doll) बनवल्या आहेत. 30 पेक्षा कमी लोक असल्याने एकटेपणा दूर करण्यासाठी बनवलेल्या या बाहुल्या एक दिवस पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतील, अशी कल्पनाही अयानोने कधी केली नव्हती. परंतु आता या बाहुल्या आणि हे बाहुल्यांचं गाव पर्यटकांना (Tourist) खुणावतं आहे. एकेकाळी फक्त 30 लोक उरलेल्या या गावात दरवर्षी 3 हजार लोक हे गाव आणि या बाहुल्या पाहण्यासाठी येतात. पूर्वी भीतीदायक मानलं जाणारं गाव आता बाहुल्यांमुळे प्रसिद्ध झालंय. या गावात सर्व प्रकारच्या बाहुल्या पाहायला मिळतात. या गावात बागकाम करणाऱ्या बाहुल्या, बसस्टॉपवर वाट पाहणारी कुटुंब, अगदी बंद पडलेल्या शाळेत शिक्षक (Teacher) आणि विद्यार्थी (Student) म्हणूनही तुम्हाला बाहुल्या दिसतात. या गावात दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी बाहुल्यांचा महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवाची पर्यटक वर्षभर वाट पाहत असतात. मुख्य म्हणजे जर्मन चित्रपट निर्माते फ्रिट्झ शुमन यांनी 2014 साली त्यांच्यावर एक चित्रपटही बनवला आहे. अयानोला एक बाहुली बनवण्यासाठी सुमारे तीन दिवस लागतात. यासाठी ती वर्तमानपत्र, कापूस, बटणे, वायर आणि इतर साहित्य वापरते. बाहुल्या तयार झाल्यानंतर ती त्यांना जुने कपडे घालायला लावते. अयानो सांगते, की बाहुल्या बनवण्याची ही योजना तिने तिच्या वडिलांच्या स्मरणार्थ तयार केली. जी नंतर जगातील पर्यटक आकर्षणांपैकी एक बनली. एकेकाळी या गावात 300 हून अधिक लोक राहत होते. मात्र कालांतराने येथील लोकसंख्या कमी होऊ लागली. युद्धाचे 100 दिवस, रशियन सैनिकांनी 2 लाख मुलांचं अपहरण केलं?; युक्रेनचा दावा खरा की खोटा ‘मला कधीच वाटलं नव्हतं की जगभरातून लोक या छोट्या गावात बाहुल्या पाहायला येतील. बाहुल्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी ते एक साधं गाव होते, ज्याची कोणालाच पर्वा नव्हती. मी इथे माझ्या वडिलांसाठी परत आले होते. ते आता राहिले नाहीत. परंतु जोपर्यंत मला शक्य आहे, तोपर्यंत मी नागोरोमध्ये राहून बाहुल्या बनवत राहीन,’ असं अयानो सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.