जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मुलीच्या लग्नात नाचता-नाचता अचानक कोसळले; पित्याचा हृदयद्रावक शेवट, नवरीनं घेतला हा निर्णय

मुलीच्या लग्नात नाचता-नाचता अचानक कोसळले; पित्याचा हृदयद्रावक शेवट, नवरीनं घेतला हा निर्णय

मुलीच्या लग्नात नाचता-नाचता अचानक कोसळले; पित्याचा हृदयद्रावक शेवट, नवरीनं घेतला हा निर्णय

आपल्या मुलीच्या लग्नात डान्स करत असतानाच वडील कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बघता बघता लग्नाचा आनंद दुःखात बदलला.

  • -MIN READ Uttarakhand
  • Last Updated :

देहरादून 13 डिसेंबर : लग्नात अतिशय आनंदी आणि उत्साहाचं वातावरण असतं. सगळे लोक अगदी आनंदात नवरदेव आणि नवरीला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतात. मात्र, कधीकधी या आनंदाच्या क्षणी असं काहीतरी घडतं, की क्षणभरात हे वातावरण दुःखात बदलून जातं. उत्तराखंडमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. अल्मोडा येथे आपल्या मुलीच्या लग्नात डान्स करत असतानाच वडील कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बघता बघता लग्नाचा आनंद दुःखात बदलला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. दुसरीकडे या घटनेनंतरही ठरलेल्या दिवशीच विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वधूच्या नातेवाईकांनी हल्द्वानी येथे जाऊन शोकाकूल वातावरणात विवाह पार पाडला. यावेळी वधूच्या मामाकडून कन्यादान करण्यात आलं. शेजारचा छेडछाड करत होता म्हणून तरुणीने मारली छतावरुन उडी आणि… मिळालेल्या माहितीनुसार, हल्द्वानी येथील मीज हॉलमध्ये रविवारी एका तरुणीचं लग्न होतं. विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वधूपक्षातील लोकांना हल्द्वानी येथे जावे लागले. याआधी मुलीच्या मेहेंदी, हळदीसह सर्व विधी तिच्या अल्मोडा येथील घरी केले जात होते. विधी दरम्यान लोक रात्री उशिरा नाचत होते. दरम्यान, वधूच्या वडिलांनीही जोरदार नृत्य केलं. दरम्यान, वधूचे वडील नाचत असताना डान्स फ्लोअरवर पडले. घाईघाईत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे विवाहितेच्या घरात शोककळा पसरली. मुलीचे हात पिवळे होण्याच्या काही तास आधीच वडिलांचा मृत्यू झाला. वधूच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. धक्कादायक! भांडणाभांडणात एकाने चावली दुसऱ्याची जीभ; झाले 2 तुकडे दुसरीकडे, रविवारी मृताच्या मुलीच्या लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. विवाह सोहळ्यासाठी वधूच्या मामासह इतर काही नातेवाईक हल्द्वानीला रवाना झाले. हल्द्वानी येथे रात्री उशिरा वधूचा विवाह सोहळा पार पडला. हल्द्वानी येथील एका लग्नमंडपात हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी वधूच्या मामाने वधूचे कन्यादानही केले. लग्नानंतर वधूचे कुटुंब अल्मोडा येथे परतणार आहे. यानंतर अंत्यसंस्कार केले जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात