चंदीगढ, 08 डिसेंबर : बऱ्याचदा वादाचं रूपांतर मारहाणीत होतं. लोक एकमेकांना मारतात. पण सध्या असं प्रकरण चर्चेत आलं आहे, ज्यात वादाने इतकं भयंकर टोक गाठलं की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची जीभ चावली. दातांनी चावून त्याने त्याच्या जिभेचा तुकडा पाडला आहे. ती व्यक्ती इतक्या जोरात चावली की जीभ तुटून वेगळी झाली. पंजाबमधील हे धक्कादायक प्रकरण आहे.
मीडिया रिपोर्टनुसार मोहालीत दोन शेजाऱ्यांमध्ये भांडणं झाली. माहितीनुसार दोन गाड्यांची धडक झाली त्यानंतर हा वाद झाला. त्यावेळी एकाने दुसऱ्याची दातांनी जीभ चावली. ज्या व्यक्तीची जीभ चावण्यात आली ती व्यक्ती नशेत होती आणि ती शिवीगाळ करत होती. त्यामुळे तिच्याशी भांडणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला राग आला. त्याच्या रागाचा पारा इतका चढला की त्याने हे धक्कादायक कृत्य केलं.
हे वाचा - मित्राचं धक्कादायक कृत्य; तरुणीला उचलून तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकलं, Shocking Video
त्याला तात्काळ तुटलेल्या जिभेसह रुग्णलायत नेण्यात आलं. तिथून पीजीआयमध्ये पाठवण्यात आलं. तिथूनही डॉक्टरांनी त्याला पंचकुलाला पाठवलं. तिथं त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण त्याची जीभ मात्र जोडता आली नाही. त्याच्या कुटुंबाने याप्रकरणी तक्रारही दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.