जाहिरात
मराठी बातम्या / देश / LED TV Blast : टीव्ही पाहताना सावधान! इतकी भयानक दुर्घटना घडली की एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

LED TV Blast : टीव्ही पाहताना सावधान! इतकी भयानक दुर्घटना घडली की एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

टीव्ही पाहताना एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 04 ऑक्टोबर : टीव्ही पाहण्याचे गंभीर दुष्परिणाम तुम्हाला माहितीच असते. टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो, आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. पण टीव्ही पाहताना कधी कुणाचा जीव गेल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे उत्तर प्रदेशमध्ये. जिथं घरात टीव्ही पाहताना अशी भयंकर दुर्घटना घडली, ज्यात एका मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. टीव्ही पाहताना असं नेमकं घडलं तरी काय की जीवावर बेतलं? हल्ली बऱ्याच घरात एलईडी टीव्ही आहे. तुमच्या घरीसुद्धा असा टिव्ही असेल तर सावध व्हा. हा टिव्ही पाहत असताना एका मुलाने आपला जीव गमावला आहे. ओमेंद्र असं या मृत मुलाचं नाव. गाझियाबादच्या हर्ष विहारमध्ये राहणारा 17 वर्षांचा ओमेंद्र घरात आपला मित्र करणसोबत टीव्ही पाहत होता. त्याच्या घरात एलईडी टीव्ही होता. दोघं जण टीव्ही पाहत असताना थोड्या वेळाने ओमेंद्रची आई ओमवतीही तिथं आली आणि तिघं एकत्र बसून टीव्ही पाहू लागले. पण यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं. हे वाचा -  Shocking Video! Traffic rule मोडल्याने वाहतूक पोलिसांनी रोखलं; बाईकस्वाराने तिथंच पेटवलं अचानक एलईडी टीव्हीमध्ये ब्लास्ट झाला. बॉम्ब फुटावा तसा हा टीव्ही फुटला आणि त्याचा आवाज इतका मोठा होता की शेजारील लोकही घाबरून घरातून बाहेर धावत आले. संपूर्ण घर धुराने भरलं होतं. घराची भिंतही तुटली होती.

News18

घरात ओमेंद्र, करण आणि ओमवती तिघंही गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान ओमेंद्रचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. तर त्याचा मित्र आणि आईवर उपचार सुरू आहेत. हे वाचा -  11 लाखांच्या गाडीच्या दुरुस्तीचे बिल तब्बल 22 लाख रूपये! वाचा काय आहे प्रकार? दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. शहराचे एसपी ज्ञानेंग्र कुमार सिंह यांनी सांगितलं की, या दुर्घटनेच्या कारणांचा तपास केला जातो आहे. हाय व्होल्टेजमुळे एलईडी टीव्ही फुटला असावा अशी शक्यता आहे. पण या पूर्ण तपास केला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात