जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विश्वासच बसत नाहीये! मृत्यूवर अशी मात शक्यच नाही; VIDEO पाहून तुम्हीच सांगा, हे Real की Fake?

विश्वासच बसत नाहीये! मृत्यूवर अशी मात शक्यच नाही; VIDEO पाहून तुम्हीच सांगा, हे Real की Fake?

चमत्कारिक पद्धतीने बचावला तरुण

चमत्कारिक पद्धतीने बचावला तरुण

एका तरुण मृत्यूच्या दारातून असा बचावला आहे, की व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 06 मे : तुम्ही असे बरेच व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात काही लोक मृत्यूच्या दारातून परत आले. अचानक आलेल्या मृत्यूतून ते चमत्कारिक पद्धतीने बचावले आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात तरुणाच्या दोन्ही बाजूने मृत्यू होते आणि तो मृत्यूच्या मधोमध होता, तरी बचावला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांचा त्यावर विश्वासच बसत नाही आहे. रस्ता ओलांडताना अपघात झाल्याची अनेक प्रकरणं आहेत. गाडी किती दूर आहे आणि तिचा वेग किती आहे याचा अंदाज घेऊनच आपण रस्ता ओलांडतो. गाडी काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचणार असेल तर आपण धावत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जातो. पण या व्हिडीओतील एक तरुण गाड्या जवळ आल्या तरी अगदी आरामात रस्ता ओलांडत होता. त्यावेळी मृत्यू अगदी त्याच्या बाजूने गेला. पण त्याला काहीच झालं नाही. VIDEO - जेसीबीतून आला ‘यमराज’, तर बोलेरोतून ‘देव’; चमत्कार पद्धतीने वाचला तरुणाचा जीव व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण रस्ता ओलांडताना दिसतो आहे. अगदी गार्डनमध्ये चालावं तसं रमतगमत, आरामात तो चालतो. इतक्यात एक भरधाव कार येते. कार त्या तरुणाला धडकणार तोच थोडा तरुण पुढे जातो म्हणून तो वाचतो. पण त्याचवेळी टूव्हिलर त्याच्यासमोर येतो, पण त्यावेळीसुद्धा तो वाचतो. फक्त व्हिडीओ पाहून आपल्याला धडकी भरते. त्याजागी कुणीही असतं, तरी घाबरलंच असतं. पण या तरुणाच्या बाबतीत तसं काहीही घडलेलं नाही. त्याच्या चेहऱ्यावर कुठचीच भीती दिसत नाही आहे. रस्त्याच्या पलिकडे तो जातो. तिथं त्याचे काही मित्र बसलेले आहेत. तेसुद्धा हसताना दिसत आहे. चमत्कारापेक्षा कमी नाही ही घटना; मृत्यूच्या दारातून परत आला मुलगा, थरकाप उडवणारा VIDEO @cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांचा हा व्हिडीओ खरा आहे, यावर विश्वास बसत नाही आहे. हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं जातं आहे.

जाहिरात

तुम्हाला या व्हिडीओबाबत काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात