मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरारारा खतरनाक ड्रायव्हर! पठ्ठ्याने तर कमालच केली; Driving Video पाहून भलेभले पडले गार

अरारारा खतरनाक ड्रायव्हर! पठ्ठ्याने तर कमालच केली; Driving Video पाहून भलेभले पडले गार

हा ड्रायव्हिंग व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल.

हा ड्रायव्हिंग व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल.

हा ड्रायव्हिंग व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 19 डिसेंबर : ड्रायव्हिंग (Driving video) करायला अनेकांना आवडतं. ड्राईव्ह करताना स्टंट (Stunt video) करायलाही काही जणांना आवडतं (Driving stunt video). कार, बाईक स्टंटचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. सध्या अशाच एका स्टंटचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे पण हा स्टंट हिरोगिरी दाखवण्यासाठी नव्हे तर समोर आलेल्या अडचणीतून सुटका करण्यासाठी करण्यात आलेला जुगाड आहे.

एका ड्रायव्हरने अशा ठिकाणी आणि अशा पद्धतीने गाडी चालवली आहे, जे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा ड्रायव्हिंग व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या ड्रायव्हरला सर्वांनी हेवी ड्रायव्हर म्हटलं आहे. PR Colours नावाच्या यूट्युब चॅेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

" isDesktop="true" id="645949" >

व्हिडीओत पाहू शकता गाडी जात असताना मध्येच एक मोठा गटार लागतो. तिथं पूलही नाही आहे. पण एक गाडीकडे पलिकडे न्यायची आहे. त्यावेळी गटाराच्या दोन्ही बाजूंवर दोन मोठी लाकडं ठेवून ड्रायव्हर त्यावरून गाडी चालवताना दिसतो.

हे वाचा - OMG! शिकार-शिकारी दोघांचाही तडफडून गेला जीव; मासा-मगरीसोबत काय घडलं पाहा VIDEO

व्हिडीओ पाहून हृदयाची धडधड वाढते. कारण या गाडीत बरीच माणसं आहेत आणि फक्त या लाकडांवर गाडीची चार चाकं आहेत. व्हिडीओ पाहताना गाडी नक्की गटारात पडणार असंच आपल्याला वाटतं पण व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिला तर धक्काच बसतो. कारण त्या लाकडांवरून गाडी बरोबर दुसऱ्या दिशेला जाते. ड्रायव्हर हळूहळू करत गाडी त्या लाकडांवरून पलीकडे नेतो. या ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण जरा जरी सुटलं असतं किंवा ज्या लाकडावरून ही गाडी जात होती, ते वजनाने तुटलं असतं, तरी गाडी धाडकन गटारात पडली असती.

हे वाचा - ड्रायव्हिंग करताना ‘फोन’वर मारत होती गप्पा, दंड करुन पोलिसच पस्तावले

तिथं उपस्थित असलेल्या काही लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत लोकांचा आवाजही ऐकायला येतो आहेत. ज्यात लोक या ड्रायव्हरला हेव्ही ड्रायव्हर म्हणत असल्याचं ऐकायला येत आहेत.  अशाच कमेंटही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर येत आहेत.

First published:

Tags: Car, Shocking viral video, Viral, Viral videos, While driving