मुंबई, 19 डिसेंबर : प्राण्यांच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ (Animal video) तुम्ही सोशल मीडियावर (Social media) पाहिले असतील. काही वेळा शिकारी आपली शिकार अगदी सहजसोप्या पद्धतीने पकडतो. तर काही वेळा शिकारीच शिकार होतो. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात शिकार आणि शिकारी दोघांचाही मृत्यू झाला आहे (Crocodile attack on electric eel). मगर आणि ईल माशाचा व्हिडीओ समोर आला आहे (Crocodile electric eel fish video). ज्यात मगरीने ईल माशावर हल्ला केला (Electric eel attack on Crocodile). पण त्या माशाला आपल्या तोंडात घेताच मगरीचा मृत्यू झाला आणि त्यापाठोपाठ ईल माशाचीही जीव गेला. कदाचित शिकारीचा असा व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हैराण झाला आहे. @zubinashara ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या दोन मिनिटांचा हा व्हिडीओ आहे.
The alligator takes a fish called eel in its jaws. The eel generates 860 volts of electricity. As a result, the crocodile dies of shock without opening the jaws and the eel also dies after being trapped in the jaws.
— Zubin Ashara (@zubinashara) December 18, 2021
Such videos are rarely seen.#TwitterNatureCommunity #wild pic.twitter.com/jhT5q5OyRn
व्हिडीओत पाहू शकता मगर पाण्याच्या किनाऱ्यावर शिकार करण्यासाठी येते. तिथंच एक ईल मासा असतो. मगर त्या ईल माशाला आपलं भक्ष्य बनवण्याच्या तयारीत असते. संधी मिळताच मगर त्या माशावर हल्ला करते. त्या माशाला आपल्या जबड्यात घेते. हे वाचा - उंदराला मरणातून वाचवण्यासाठी कावळ्याची धडपड; कसा वाचवला जीव पाहा VIDEO ईलला जबड्यात घेताच मगर आणि ईल दोघींमध्ये झटापट होत असताना दिसते. ईल मासा मगरीच्या जबड्यातून सुटण्यासाठी धडपडतो पण त्याचवेळी मगरही धडपडताना दिसते. मगर शिकारी आपल्या तोंडातून जाऊ नये, यासाठी प्रयत्न करते असं वाटतं. पण खरंतर मगरही आपल्या जीवासाठी धडपडत असते. कारण ईल माशाला तोंडात घेताच मगरीला झटका बसतो. कारण ईल मास करंट सोडतो. मगरीच्या तोंडात जाताच ईल मासा आपल्या बचावासाठी इलेक्ट्रिक करंट सोडते ज्यामुळे मगरीला हा करंट लागतो आणि मग मगरही तडफडताना दिसते. पण ती काही ईलला आपल्या तोंडातून सोडत नाही. काही वेळ दोघंही असेच तडफडतात. त्यानंतर मगर आणि ईल दोघांचाही मृत्यू होतो. हे वाचा - जगातील सर्वात सुंदर ‘मोदी म्हैस’; किंमत जाणून व्हाल थक्क, रंजक आहे नावामागची कथा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. शिकाराला शिकारीवर असा हल्ला करताना पहिल्यांदाच पाहिलं आहे, हा व्हिडीओ पाहून आपण खूप हैराण आहोत, अशा प्रतिक्रिया युझर्स देत आहेत.