मुंबई, 04 मार्च : फेमस होण्यासाठी, लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी काही जण काय काय करत नाहीत. विशेषतः तरुण बाईक चालवत असतील तर बाईकवर स्टंट मारण्याची एक संधी ते सोडत नाही. बाईक स्टंटचे (Bike stunt video) बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एका व्हिडीओ चर्चेत आला आहे. जो पाहूनच धडकी भरेल. इतका भयानक बाईक स्टंट तुम्ही याआधी पाहिला नसेल. एक तरुण चक्क हायवेवर बाईक स्टंट करताना दिसला. हायवे म्हटलं की तिथं बऱ्याच गाड्या एका विशिष्ट वेगाने जात असतात. त्यामुळे वाहतुकीसंबंधी एका छोट्याशा चुकीमुळेही अपघात होऊन मृत्यूचा धोका असतो. असं असताना हा तरुण मात्र बिनधास्तपणे बाईक स्टंट करताना दिसतो आहे. हे वाचा - लेकाला वाचवण्यासाठी चवताळलेल्या बैलासमोर आला बाबा आणि…; धडकी भरवणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता हा तरुण हायवेवर बाईक चालवतो आहे. पण तो बाईकवर बसलेला नाही तर झोपलेला आहे. बाईकवर आडवा होऊन त्याने आपले दोन्ही हात हँडलवरून सोडून दिले आहेत. हात आणि पाय तो हवेत उडवताना दिसतो. जसं फुलपाखरू उडावं तसं तो चालत्या बाईकवर आपले हातपाय उडवतो. त्यानंतर उडून बाईकवर आडवा बसतो, त्यानंतर उभा राहतो. बाईक तशीच वेगाने जात असते.
बाईकच्या मागे एक बस आहे. या बसमधील एका व्यक्तीने या तरुणाचा हा संपूर्ण प्रताप आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - VIDEO - कंबर मोडली, मान लचकली; ‘पुष्पा’च्या ‘श्रीवल्ली’वर नाचून वऱ्हाड्यांचे हाल यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. असा भयानक स्टंट करून हा तरुण यमराजला आमंत्रण देतो आहे, अशीच प्रतिक्रिया बहुतेक नेटिझन्सनी दिली आहे. नेटिझन्सनी यावर संताप व्यक्त केला आहे.