Home /News /viral /

OMG! चाकूने तुकडे करून खाल्ला साप; VIDEO पाहूनच नेटिझन्सचा उडाला थरकाप

OMG! चाकूने तुकडे करून खाल्ला साप; VIDEO पाहूनच नेटिझन्सचा उडाला थरकाप

तरुणाने सापाचे दोन भाग केले आणि...

  मुंबई, 21 ऑक्टोबर : साप (Snake) म्हटलं तरी आपल्याला धडकी भरते. सापाचे बरेच व्हिडीओ (Snake video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. सध्या सापाचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून नेटिझन्सना धक्काच बसला आहे. एका व्यक्तीने या सापाला चाकूने कापलं (Snake cake video) आहे आणि हा साप खाल्ला आहे (Realistic snake cake video). व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडले. पांढऱ्या-पिवळ्या रंगाचा एक साप टेबलावर वेटोळे घालून बसलेला दिसतो आहे. इतक्यात एक व्यक्ती या सापावर चाकू मारते. चाकूने सापाचे दोन भाग करते. अरे हे काय? हा साप नाही तर चक्क एक केक आहे. जो अगदी खऱ्याखुऱ्या सापासारखाच दिसतो. हा केक इतक्या सुंदर पद्धतीने बनवण्यात आला आहे की खरा साप आणि केक यातील फरकच ओळखू येत नाही. व्यक्ती जेव्हा सापाला कापते तेव्हा आतील भागावरून तो केक असल्याचं समजतं.
  @sideserfcakes इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आमच्या मित्रांसाठी रियलिस्टिक स्नेक केक, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून काही नेटिझन्सचा थरकाप उडाला आहे. काही युझर्सनी आपण खूप घाबरल्याचं म्हटलं आहे. तर काही युझर्सनी हा केक तयार करणाऱ्याच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे. हे वाचा - Crocodile fish : याला मगर म्हणायचं की मासा? जाळ्यात अडकला विचित्र जलचर बर्थ डे असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा कोणताही आनंद साजरा करायचा असेल तर सध्या केक आणलाच जातो. आता वेगवेगळ्या चवीचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या पद्धतीचे बरेच केक उपलब्ध आहेत. अगदी आपल्याला हवा तसा केक बनवून मिळतो. तशाच केकपैकी हा स्नेक केक आहे. याआधीही एका तरुणीने अगदी आपल्या चेहऱ्यासारखा हुबेहूब केक बनवला आहे.
  sideserfcakes इन्स्टाग्राम अकाऊंटवर या केकचा व्हिडीओ आहे.. या केक कलाकाराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हे माझे आतापर्यंतचे सर्वात आवडते चित्र आहे आणि माझा चेहरा पूर्णपणे केकने बनवला आहे.' हे वाचा - Scuba Diving करताना आढळला 900 वर्षांपूर्वीचा खजिना हा केक इतक्या बारकाईने तयार करण्यात आला आहे की तरुणीचा चेहरा आणि केक यातला फरक ओळखणं कठीण आहे. तथापि, या पेजवर आगळ्या वेगळ्या केकची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकवेळा केकचे पुतळेदेखील तयार केले आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Food, Snake, Snake video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या