मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बापरे! KFC Hot Wings च्या डब्यात काय सापडलं पाहा; ग्राहकाने शेअर केला Shocking photo

बापरे! KFC Hot Wings च्या डब्यात काय सापडलं पाहा; ग्राहकाने शेअर केला Shocking photo

चिकनमध्ये महिलेला असं काही सापडलं की तिला धक्काच बसला.

चिकनमध्ये महिलेला असं काही सापडलं की तिला धक्काच बसला.

चिकनमध्ये महिलेला असं काही सापडलं की तिला धक्काच बसला.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 23 डिसेंबर : बरेच लोक अगदी आवडीने चिकन (Chicken) खातात. त्यांना चिकनचे वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला आवडते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर किंवा ऑनलाईन मुद्दामहून चिकनचा पदार्थ ऑर्डर केला जातो. पण त्यात चिकनऐवजी तुम्हाला काही वेगळंच सापडलं तर? यूकेतील एका महिलेसोबत असं घडलं आहे (Head found in Hot chicken Wings).

ग्रॅबिअल नावाच्या या महिलेने आपल्यासाठी हॉट चिकन विंग ऑर्डर (KFC Hot Wings) केलं होतं. पण डबा उघडताच तिला मोठा धक्काच बसला. तिला चिकनमध्ये असं काही सापडलं जे पाहूनच ती हादरली. तिने तात्काळ याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो पाहून एकच खळबळ उडाली आहे.

हॉट विंग्सच्या डब्यात महिलेला चक्क चिकनचं डोकं मिळालं. जे बॅटरसोबत क्रिस्पी डीप फ्राइड केलं होतं. चोच आणि डोळे असलेलं हे डोकं स्पष्ट या फोटोत दिसत आहे.

हे वाचा  - आता Burger खाता खाताच घटवा वजन; McDonald’s ने शोधला सॉलिड उपाय; पाहा VIDEO

सोशल मीडियावर पोस्ट करत ती म्हणाली, मला आपल्या हॉट विंग्स मील ऑर्डर केलं होतं. त्यात फ्राइड चिकन हेड सापडलं. ज्यामुळे मी माझ्या मीलचा पुरेपूर आनंद घेऊ शकली नाही. ग्रॅबिअलने जस्टईस्टवर रिव्ह्यूमध्ये दोन स्टार दिले आहेत.

द सनच्या रिपोर्टनुसार महिलेने हे चिकन लंडनच्या ट्विकेनहॅममधील केएफसी फेलथमहून ऑर्डर केलं होतं. केएफसीने याबाबत ट्विटर पोस्ट केली आहे. ही घटना आश्चर्यचकीत करणारी असल्याचं म्हटलं आहे. ग्राहकाद्वारे देण्यात आलेल्या रिव्ह्यूला मोस्ट जेनरस टू स्टार रिव्ह्यू म्हटलं आेह. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचा  - अमिताभ बच्चन यांनी आवडीने खाल्ला नागिन सॉस; काय असतं त्यात, त्याची किंमत काय?

केएफसीने रिपोर्टच्या हवल्याने सांगिलं, हा फोटो हैराण करणार आहे. याबाबत माहिती मिळताच आम्ही ग्रॅबिएलशी संपर्कात आहोत. हे नेमकं कसं झालं हे आम्ही पाहत आहोत.

First published:

Tags: Chicken, Food, Health, Lifestyle