जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पुराच्या पाण्यातून चालत आरामात ओलांडत होता नदी; अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

पुराच्या पाण्यातून चालत आरामात ओलांडत होता नदी; अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

पुराच्या पाण्यातून चालत आरामात ओलांडत होता नदी; अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पुलावरून नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ पाहून लोक भयभीत झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ समोर येत राहतात, जे पाहून तुम्ही म्हणाल की हा काय वेडेपणा आहे. फोटो आणि सेल्फीसाठी लोक काहीही करायला तयार असतात. पण अनेक वेळा तुम्हाला असे व्हिडिओही पाहायला मिळतील, जे पाहून तुम्हीही त्या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक कराल. असाच एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पुलावरून नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ पाहून लोक भयभीत झाले आहेत. तसंच लोकांना आपला जीव धोक्यात घालण्याची हिंमत का आणि कशी होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गाडीला ओव्हरटेक करायला गेला आणि घडलं खूप भयानक, भीषण अपघाताचा थराराक VIDEO हा व्हिडिओ makassar_iinfo नावाच्या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर पोस्ट केला गेला आहे. हा व्हिडिओ इंडोनेशियातील दक्षिण सुलावेसी प्रांतातील असल्याचं सांगितलं जात आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, येथील एका नदीला पूर आला असून पाणी वेगाने वाढत आहे. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर शेकडो लोक उपस्थित असून ते पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा रुदावतार पाहत आहेत. तुम्हीही तिथे असता तर या ठिकाणाहून पूल ओलांडण्याचा विचार क्वचितच केला असता. पण एक व्यक्ती धाडसी निघाली.

जाहिरात

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक व्यक्ती नदीच्या मध्यभागी असलेला पूल कसा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. समोरून पुलावर पाणी येत असून ही व्यक्ती अतिशय आरामात पूल ओलांडत आहे. हे बघून तो पुलावर फिरायला आल्याचा भास होतो. आजूबाजूचे लोक ओरडून त्याला परत बोलावतात. अनेक जण व्हिडिओही बनवत आहेत, तर काही जण हसण्याचा आवाजही काढत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भागात नद्यांना अनेकदा उधाण आलं आहे. अशा वेळी नद्यांच्या आसपास कोणी फिरकत नाही. या पाण्यामुळे अनेकदा दुर्घटनाही घडल्या आहेत. मात्र हा व्यक्ती कोणाचंही ऐकायला तयार नाही. हात पकडून वर घेतलं आणि नंतर….चिंपाझीचा मुलासोबतचा प्रेमळ Video एका दिवसापूर्वीच हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, जो पाहताच व्हायरल झाला. आतापर्यंत सुमारे 80 हजार लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. काही लोक याला सुपरमॅन म्हणत आहेत तर अनेकजण याला वेडेपणा म्हणत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं, जर ही परिस्थिती तुमच्या समोर आली तर पायात जड शूज घालण्याचा प्रयत्न करा. एका व्यक्तीने लिहिलं - लोक व्हायरल होण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात