जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गाडीला ओव्हरटेक करायला गेला आणि घडलं खूप भयानक, भीषण अपघाताचा थराराक VIDEO

गाडीला ओव्हरटेक करायला गेला आणि घडलं खूप भयानक, भीषण अपघाताचा थराराक VIDEO

भीषण अपघात

भीषण अपघात

रस्त्यावरील अपघाताच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ठिकठिकाणी अपघात होत असून याचे अनेक फोटो व्हिडीओदेखील समोर येत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : रस्त्यावरील अपघाताच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ठिकठिकाणी अपघात होत असून याचे अनेक फोटो व्हिडीओदेखील समोर येत असतात. सावधगिरी बाळगली नाही तर अनेक अपघात होतात आणि यामध्ये अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागतो. काही वेळेस लोक खूप थोडक्यात वाचतात. अशातच अपघांतांच्या घटनेमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. या अपघाताचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. नशीब बलवत्तर असेल तर अनेकजण गंभीर आणि भीषण अपघातातूनही सुरक्षित वाचतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या अपघाताच्या व्हिडीओमध्ये पहायला मिळालं. सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये, एक बाईक चालवणारी व्यक्ती रस्त्यावरून जाताना दिसत आहे. मात्र अचानक समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात व्यक्तीचा तोल बिघडतो आणि त्याची दुचाकी रस्त्यावर घसरून तो ट्रकखाली येतो. बसखाली जाऊन पण नशिबाने व्यक्ती मृत्यूपासून वाचतो. हा अपघाताचा थराराक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

जाहिरात

@ViciousVideos या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर खूप कमेंट येत असून हा अपघाताचा थरार पाहून अंगावर काटा आल्याशिलाय राहत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओमध्ये पाऊस पडत असून पावसाचं पाणी रस्त्यावरही जमा झाल्याचं दिसतंय. यामुळे गाडी घसरली आणि हा भीषण अपघात घडला. पावसामुळे रस्ते खूप घसरडे होतात आणि अपघात जास्त प्रमाणात घडू शकतात. पावसाळ्यात सहसा खूप सावधानी बाळगण्याची गरज असते. अशा भीषण अपघाता वाचण्याची शक्यता फार कमी असते. रस्त्यावरून चालताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे नेहमीच सांगितले जाते. रस्त्यावरून चालताना नेहमी सतर्क राहा. कधी कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे कुणाचा जीव जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात