जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी भाड्याने घेतली 1.5 कोटींची गाडी, रस्त्यातच धडकली आणि..., पाहा VIDEO

गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी भाड्याने घेतली 1.5 कोटींची गाडी, रस्त्यातच धडकली आणि..., पाहा VIDEO

गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी भाड्याने घेतली 1.5 कोटींची गाडी, रस्त्यातच धडकली आणि..., पाहा VIDEO

आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी मुलं काहीही करतात. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या मुलासाठी तुम्हालाही प्रचंड वाईट वाटेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी मुलं काहीही करतात. अनेकदा याचे परिणाम मात्र भलतेच होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या मुलासाठी तुम्हालाही प्रचंड वाईट वाटेल. मिळालेल्या माहितीनुसार. आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी एका मुलानं भाड्यानं सर्वात महागडी Mercedes Benz G-Wagon भाड्यानं घेतली होती. Mercedes Benz G-Wagon या गाडीची किंमत भारतात 1.5 ते 2 कोटीपर्यंत आहे. गर्लफ्रेंडला भेटायला जात असताना रस्त्याच या मुलाकडून गाडीचा अपघात झाला. गाडी रस्त्यावरच्या खांबाला धडकली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- अशी पेरणी तुम्ही कधीच पाहिली नसेल! शेतकऱ्यानं केलेल्या जुगाडाचा VIDEO VIRAL

जाहिरात

वाचा- झोप महत्त्वाची बाबा! चोरी करायला गेला अन् त्याच घरात लागला चोराचा डोळा मग… मुख्य म्हणजे गाडीचा अपघात झाल्यानंतर हा मुलगा गाडी तिकडेच टाकून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला. त्यावेळी या मुलानं गाडी धडकल्याचे समोर आले. वाचा- OMG! खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र नेटकऱ्यांनी विविध रिप्लाय दिले आहेत. काहींनी या मुलाचं नशीब खूप वाईट असल्याचं म्हंटलं आहे तर, काहींनी मुलींचाच नादच वाईट अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात