मुंबई, 14 सप्टेंबर : लग्नातील (Indian Wedding) विविध कार्यक्रम बरेच दिवस सुरू असतात. अशात नवरदेव-नवरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य पूर्णतः थकून जातात. कधी कधी या व्यक्ती इतक्या थकतात, की लग्नसमारंभादरम्यानच त्यांना झोप येते. सोशल मीडियावर (Social Media Viral) अनेकदा लग्नसमारंभातील व्हिडिओ व्हायरल (Wedding Videos) होत असतात. सध्या असाच एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात नवरीबाई झोपलेली दिसत आहे (Bride sleeping video).
लग्नातच नवरीला गाढ झोप लागली. शेजारी नवरा बसलेला आहे. तिला झोपलेलं पाहून तिची मैत्रीण तिथं नवरदेवाजवळ आली आणि तिनं असं काही केलं की नवरीबाईची झोपच उडाली.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता, लग्नसमारंभ सुरू आहे. नवरा-नवरी मंडपात एकमेकांशेजारी बसलेले आहेत. नवरी मात्र मस्त झोपलेली दिसते आहे.
हे वाचा - लग्नातच नवरीबाईला 'जोर का झटका'! नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून उडालीच; VIDEO VIRAL
नवरीबाईला झोप येऊ लागते आणि ती बसल्या बसल्याच झोपी जाते. नवरीची मैत्रिणी तिथं येते आणि तिला उठवतो. गूड मॉर्निंग गूड मॉर्निंग म्हणत तिला उठवण्याचा प्रयत्न करते. गाढ झोपलेल्या नवरीच्या कानावर मैत्रिणीचा आवाज पडतो आणि तिला अचानक जाग येत. ती पटकन आपले डोळे उघडते. तेव्हा तिची मैत्रिणी जोरजोरात हसते. नवरीबाईलाही आपलं हसू आवरत नाही.
हे वाचा - लग्नमंडपातच नवरदेव-नवरीची मस्ती; VIDEO चा शेवट पाहून आवरणार नाही हसू
दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननुसार नवरी फेऱ्यादरम्यान झोपली असं सांगण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video