मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! हे काय आहे? कारमधील कचऱ्यात दिसलं असं काही की पाहूनच फुटेल घाम

बापरे! हे काय आहे? कारमधील कचऱ्यात दिसलं असं काही की पाहूनच फुटेल घाम

फक्त कचरा भरलेला म्हणून नाही तर ही कार त्या विचित्र गोष्टीमुळे चर्चेत आहे.

फक्त कचरा भरलेला म्हणून नाही तर ही कार त्या विचित्र गोष्टीमुळे चर्चेत आहे.

फक्त कचरा भरलेला म्हणून नाही तर ही कार त्या विचित्र गोष्टीमुळे चर्चेत आहे.

ब्रिटन, 14 सप्टेंबर : आपल्याकडे किमान एक तरी कार (Car) असावी असं किती तरी जणांना वाटतं. काही जण कारला अगदी आपल्या जीवाप्रमाणेच जपतात. त्यावर एक डागही पडू नये, याची काळजी घेतात, ती नियमित स्वच्छ करतात, त्याची देखभाल करतात. तर काही जण असेही असतात ज्यांच्यासाठी कार म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं यासाठी फक्त एक साधन असतं. त्या कारची अवस्था अक्षरशः भयंकर असते. सध्या अशाच एका कारचा फोटो (Dirtiest Car Viral Photos) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

यूकेतील MOT टेस्टर सॅम बर्रोसने (Sam Burrows) सोशल मीडियावर एका कारचा फोटो (Car photo) शेअर केला आहे. ही कार इतकी अस्वच्छ आहे की पाहूनच किळसवाणं वाटतं. पण या कारने आणखी एका गोष्टीमुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अगदी कचऱ्याने खचाखच भरलेल्या या कारमध्ये एक चेहरा दिसला आहे, जो पाहून सर्वजण हादरले आहेत (Face in car).

हे वाचा - बॅट्समनने मारला असा शॉट, टीव्हीबाहेर आला बॉल; आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

सॅमने सांगितलं, या कारचा मालक ही कार घेऊन गॅरेजमध्ये आला. पण गाडीची अवस्था पाहून त्याने त्याची सफाई करण्यास नकार दिला. या कारमध्ये अस्वच्छ कपडे, खराब झालेल्या अन्नपदार्थाचे बॉक्स, ड्रिंक्सच्या बाटल्या अशा वस्तू भरलेल्या होत्या. शिवाय कारमध्ये गुटख्याची पाकिटंही पडली होती. कारमधून खूप दुर्गंधी येत होती.  कारची अशी अवस्था पाहून मेकॅनिकने त्याची स्वच्छता करायला नकार दिला.

सॅमने MOT टेस्ट फोरमच्या वेबसाईटवर या कारचा फोटो शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कारची सफाई न कऱण्याचा सॅमचा निर्णय योग्यच असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पण कारच्या अस्वच्छतेपेक्षा कारच्या सीटवरील एका गोष्टीने लोकांचं लक्ष वेधलं. या कारच्या सीटवर एक चेहरा दिसला.

हे वाचा - सलूनमध्ये दाढी करता करता हादरला तरुण, जागीच बेशुद्ध झाला; नेमकं काय घडलं पाहा

तुम्ही फोटो नीट पाहिला तर ड्रायव्हरच्या सीटच्या मागच्या बाजूला एक चेहरा तुम्हालाही दिसेल. या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

First published:
top videos