मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हातपाय न लावताच झाडावर सरसर चढला; तरुणाचा Jugaad Video पाहून नेटिझन्स हैराण

हातपाय न लावताच झाडावर सरसर चढला; तरुणाचा Jugaad Video पाहून नेटिझन्स हैराण

आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट या व्यक्तीने सहजपणे शक्य करून दाखवली आहे.

आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट या व्यक्तीने सहजपणे शक्य करून दाखवली आहे.

आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट या व्यक्तीने सहजपणे शक्य करून दाखवली आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 21 डिसेंबर : झाडावर चढायचं (Climibing on tree) म्हटलं तर हात आणि पायांचा वापर हा होतोच. पण हातपाय न वापरता कुणी झाडावर चढलं असं सांगितलं तर साहजिकच कुणालाही आश्चर्य वाटेल (Climb on tree without using hand). असं शक्यच नाही असं तुम्ही म्हणाला. पण आपल्याला अशक्य वाटणारी ही गोष्ट सहजपणे शक्य करून दाखवली आहे ती एका व्यक्तीने. या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

एक व्यक्ती हातापायांचा वापर न करता म्हणजे झाडाला बिलकुल हातपाय न लावता झाडावर चढला आहे. तो इतक्या वेगाने झाडावर चढला आणि उतरला की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. आता झाडावर असं कसं काय चढता येईल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि हे जाणून घेण्याची किंवा व्हिडीओ पाहण्याची उत्सुकताही वाढली असेल.

हे वाचा - जबरदस्त! एका उडीतच मांजराने पार केली भलीमोठी नदी; VIDEO पाहून IAS अधिकारीही थक्क

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती उंच झाडाखाली उभा आहे. त्याच्या हातात एक मशीन आहे. झाडाच्या खोडाला ते मशीन लावतो. त्यानंतर त्यावर बसतो. मशीनवर खाली दोन पाय ठेवतो आणि वर दोन हँडल पकडतो. त्यानंतर मशीन चालवत तो झाडावर चढतो. जणू रस्त्यावर गाडी चालवावी तशी झाडावर तो ही मशीन चालवतो.

View this post on Instagram

A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

अगदी काही सेकंदांत तो उंच झाडावर चढतो आणि खालीही उतरतो. हातपाय न लावता झाडावर पटापट चढणं सोपं नाही. पण या मशीनमुळे ते अगदी सहजसोपं झालं आहे.  जुगाड लाइफ हॅक नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. देशी अंदाजात झाडावर चढण्याची टेक्नोलॉजी असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. कर्नाटक, गोव्यात या मशीनचा उपयोग केला जात असल्याची माहितीही या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

हे वाचा - OMG! घोडाही असं करू शकतो? आईसमोरच पिल्लाला जिवंत गिळलं; Shocking Video Viral

शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी टेक्नॉलॉजी आता फक्त ट्रॅक्टरपुरताच मर्यादित राहिली नाही. तर शेतकऱ्यांना मदत होईल, त्यांचं काम सोपं होईल, अगदी कमीत कमी वेळात होईल, यासाठी असे बरेच यंत्र सध्या बाजारात उपलब्ध आहेत आणि आपल्या सोयीसाठी शेतकरी त्यांचा वापरही करताना दिसतात.

First published:

Tags: Viral, Viral videos