जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भविष्यात 650 वर्ष पुढे जाऊन परत आली व्यक्ती, दुसऱ्या पृथ्वीबद्दल ही केला खुलासा

भविष्यात 650 वर्ष पुढे जाऊन परत आली व्यक्ती, दुसऱ्या पृथ्वीबद्दल ही केला खुलासा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आत्तापर्यंत भविष्य पाहाणे किंवा भविष्यातून व्यक्ती येणे हे फक्त आपण चित्रपटांमध्ये पाहात होते. तथापि, काही लोक असा दावा करतात की ते भविष्यातून परत आले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 जून : असे अनेक लोक आहेत, जे आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी एकाद्या बाबांकडे जातात. हे लोक भविष्यात काय करणार आहेत किंवा त्यांच्या नशीबी काय येणार हे सगळं त्या बाबांना ठावूक असतं आणि तसंच घडणार असे ते दावा देखील करतात. शिवाय तुम्ही असे देखील काही लोक पाहिले असतील जे दावा करतात की त्यांनी भविष्य पाहिलं आहे किंवा त्यांना भविष्य दिसतं. लोकांना भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी फारच उत्सुक असतात. त्यामुळे जगातील अनेक वैज्ञानिक असे उपकरण बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे भविष्यात जाण्यास मदत करू शकतात. आत्तापर्यंत भविष्य पाहाणे किंवा भविष्यातून व्यक्ती येणे हे फक्त आपण चित्रपटांमध्ये पाहात होते. तथापि, काही लोक असा दावा करतात की ते भविष्यातून परत आले आहेत. Ajab Gajab : असा प्राणी ज्यावर होत नाही किंग कोब्राच्याही विषाचा परिणाम अलीकडेच एका व्यक्तीने सोशल मीडियावर असाच दावा केला आहे. अनो अलारिक नावाच्या या व्यक्तीचे म्हणणे आहे की, तो 2671 सालापासून परतला आहे. आजपासून 248 वर्षांनंतर जगाची सर्व माहिती त्यांच्याकडे असल्याचे त्यांने सांगितले. त्याच्या म्हणण्या प्रमाणे जगात कधी काय घडेल हे त्याला सर्व माहीत आहे? या वेळी प्रवाशाने सांगितले की, जगात तिसरे महायुद्ध केव्हा सुरू होणार हे त्यांना नक्की माहीत आहे. जगातील सर्व तज्ञ अजूनही याबद्दल फक्त अंदाज लावत आहेत. Knowledge : भारत, इंडिया आणि…. भारताचे एकून 9 नावं तुम्हाला माहितीयत? सोशल मीडियावर एनोने theradianttimetraveller नावाचे खाते तयार केले आहे. त्याने आपल्या अंदाजाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंत त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. तिसर्‍या महायुद्धाव्यतिरिक्त, एनोने जगावर एलियन आक्रमण आणि पृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाच्या भेटीची भविष्यवाणी केली आहे. अलीकडेच एनो त्याच्या आणखी एका भविष्यवाणीमुळे चर्चेत आला. रॉन डीसँटिस हे अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष होतील, असे भाकीत त्यांनी केले आहे. हे पाहावे लागेल की तिसरे महायुद्ध खरेच दोन वर्षांनी सुरू होईल की एनोने हे भाकीत केवळ फॉलोअर्स वाढवण्यासाठी केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात