मुंबई, 26 जून : साप हा सर्वात खतरनाक प्राणी आहे. त्याचे नाव घेताच लोक लांब पळतात. कारण त्याचा एक दंश कोणाच्याही मृत्यूचं कारण ठरायला पुरेसं आहे. त्यात किंग कोब्रा हा सगळ्या सापांपेक्षा धोकादायक आहे. त्याला फणा काढलेला पाहून तर लोकांना समोर मृत्यूच दिसू लागतो. पृथ्वीवरील सर्वात विषारी प्राण्यांमध्ये किंग कोब्राचे नाव समाविष्ट आहे. त्यामुळे जंगलातील बहुतांश प्राणी देखील त्याच्या वाट्याला जात नाहीत. कारण सिंह किंवा वाघा सारख्या बलाढ्य आणि शक्तिशाली प्राण्याला मारण्यासाठी सापाचा दंश पुरेसा आहे. King Cobra : साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का? व्हिडिओत जे घडलं त्याची कल्पना करू शकत नाही पण तुम्हाला माहितीय का की असा एक प्राणी आहे. ज्याला सापाच्या दंशाचा काहीही परिणाम होत नाही. हो, हे खरं आहे असा एक प्राणी आहे. ज्याला सापाच्या दंशाचा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे या प्राण्याला सापाची भीतीच वाटत नाही. या प्राण्याचे नाव मीरकॅट्स आहे. हे लहान प्राणी मुंगूसच्या कुटुंबातील आहेत. ते सहसा दक्षिण आफ्रिकेच्या अर्ध-शुष्क आणि शुष्क प्रदेशात आढळतात. त्यांचे वजन 2 पाउंड पर्यंत असते आणि त्यांची उंची 12 इंच (1 फूट) पर्यंत वाढू शकते. त्यांची दृष्टी, वास घेण्याची क्षमता आणि ऐकण्याची क्षमता खूप जास्त आहे. हे मीरकॅट्स लहान सरडे, विंचू, साप आणि त्यांची अंडी खातात. त्यांना एक ‘वरदान’ आहे की कोब्रा आणि विंचूच्या विषाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. ज्यामुळे अशा खतरनाक प्राण्यांनाही ते शिकार बनवतात. ते कोरड्या भागात राहत असल्याने ते जे अन्न खातात त्यातून त्यांना पाणी मिळते. त्यांचे वय 10 ते 13 वर्षांच्या दरम्यान आहे. Viral Video : किंग कोब्राशी खेळ म्हणजे मृत्यूला आमंत्रण, तरुणाने सापाची शेपटी पकडली आणि… मीरकाट हे अतिशय सामाजिक प्राणी आहेत त्यांना एकमेकांसोबत खेळायला आवडते. त्यांच्या गटातील प्रत्येक सदस्याला एक एक कामे वाटून दिलेली असतात, ज्याचा सर्वांना फायदा होतो. मीरकाट बुरुजांमध्ये राहतात जेव्हा ते शिकार करतात तेव्हा ते त्यासाठी रणनीती बनवतात.काही साथीदार शिकार शोधतात, काही रणनीती बनवतात आणि काही शिकार करतात. हे प्रादेशिक प्राणी आहेत. त्यांच्या क्षेत्राचा सरासरी आकार 4 चौरस मैल आहे. ते त्या भागात मोठा खड्डा किंवा गुहा बनवतात आणि धोका असेल तेव्हा त्यात लपतात. मीरकॅट पावसाळ्यात मेटिंग करतात. एक मादी मीरकॅट्स 2-5 शावकांना जन्म देते. ही मुलं घट्ट अन्न खाण्यास तयार होईपर्यंत आईबरोबर राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.