जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: रस्त्यावरच धावत्या रिक्षाचा टायर बदलला; चालकाचा 'पराक्रम' बघून थक्क व्हाल

Viral Video: रस्त्यावरच धावत्या रिक्षाचा टायर बदलला; चालकाचा 'पराक्रम' बघून थक्क व्हाल

रस्त्यावरच धावत्या रिक्षाचा टायर बदलला

रस्त्यावरच धावत्या रिक्षाचा टायर बदलला

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की रस्त्यावर एक ऑटो वेगाने धावत आहे. इतक्यात ड्रायव्हर अचानक एका बाजूने आपलं वाहन उचलतो आणि नंतर..

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 जुलै : जगात असे अनेक लोक आहेत, जे असं काहीतरी करतात की सगळं जग पाहतच राहतं. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील व्यक्ती रस्त्यावरच धावत्या ऑटोचा टायर बदलताना दिसत आहे. सामान्यतः लोकांची गाडी पंक्चर झाली की ते थेट पंक्चरच्या दुकानात जातात किंवा गाडी थांबवतात आणि आधी टायर बदलतात. यानंतरच गाडी पुढे घेऊन जातात, पण तुम्ही क्वचितच कधी कोणी गाडीचा टायर अशा प्रकारे बदलताना पाहिलं असेल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की रस्त्यावर एक ऑटो वेगाने धावत आहे. इतक्यात ड्रायव्हर अचानक एका बाजूने आपलं वाहन उचलतो आणि नंतर दुसरा व्यक्ती वेगाने टायर खोलतो. दरम्यान, दुसरी रिक्षा तिथे पोहोचते आणि त्यात बसलेला एक मुलगा पंक्चर झालेल्या ऑटोतील व्यक्तीला दुसरा टायर देतो आणि त्याच्याकडून पंक्चर झालेला टायर घेतो. हे सर्व चालत्या ऑटोमध्येच होत आहे. मग ती व्यक्ती पटकन टायर त्याच्या जागी सेट करू लागते. Oops! धाग्यासारखी बिकिनी घालून चढत होती डोंगर, खडकात अडकलं टोक अन्…; सर्वकाही LIVE VIDEO मध्ये दिसलं विशेष म्हणजे एकाच बाजूच्या चाकावर उभा असूनही ऑटो रस्त्यावर धावतच राहाते. तर सहसा कोणीही वाहनचालक वाहन उलटण्याच्या भीतीने असा काही प्रकार करत नाही. मात्र यात चालकाने ज्या पद्धतीने हे सगळं केलं ते चकित करणारं आणि तितकंच धोकादायकही आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. desi_rajsthani_vlogs नावाच्या अकाऊंटवरुन तो इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे.

जाहिरात

आतापर्यंत हा व्हिडिओ 8 लाख 23 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, 60 हजारहून अधिकांनी लाईकही केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं, हा चालक किती खतरनाक असेल की त्याने ऑटोचा तोलही बिघडू दिला नाही. एकाने म्हटलं की असे ड्रायव्हर फक्त भारतातच पाहायला मिळतील. इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात