ब्राझिलिया, 29 ऑगस्ट : हल्ली लोक प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करतात. अगदी स्वतःचा जीवही धोक्यात टाकतात. असे किती तरी जीवघेणे स्टंट तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. असाच धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती एका लाइव्ह टीव्ही शोमध्ये आगीशी स्टंट करत होता. पण त्यानंतर भयंकर दुर्घटना घडली. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता टीव्ही शोमध्ये तीन व्यक्ती स्टेजवर दिसत आहे एका व्यक्तीने दोन लाकूड हातात धरले आहेत, ज्याला कपडा गुंडाळला आहे. एका लाकडीला तो आग लावतो आणि मध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातात देतो. ती व्यक्ती त्या लाकडाने दुसरं लाकूडही पेटवते. त्यानंतर एक व्यक्ती स्टेजवर ठेवलेलल्या टेबलच्या कपातून काहीतरी पितो. त्यानंतर ते तोंडात धरतो आणि त्यानंतर दोन्ही पेटलेले लाकूड हातात घेऊन मध्येच उभा राहतो. दोन्ही लाकडं तोंडाच्या वर धरून तो त्यावर फुंक मारतो. त्याचवेळी आग भडकते. आपल्यालाही धडकी भरते. हे वाचा - आगीशी खेळणे पडलं महाग! Viral Video पाहून तुम्हाला बसेल जशी ही व्यक्ती फुंक मारते तशी तिच्या तोंडातही आग लागते आणि अचानक चेहराही पेटतो. त्यानंतर ती व्यक्ती काठ्या खाली फेकून देते ज्यामुळे स्टेजवरही आग लागते. व्यक्ती आपल्या हातांनी चेहऱ्यावरील आग विझवण्याचा प्रयत्न करते. पण आग काही विझत नाही. तशी ती स्टेज सोडून तिथून पळते.तिला पाहून स्टेजवरील इतर व्यक्तींनाही धडकी भरते आणि तेसुद्धा त्या व्यक्तीच्या मागे बॅक स्टेज पळतात.
द डार्विन अवॉर्ड्स या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून बहुतेकांना धडकी भरली आहे. एका युझरने असे स्टंट करताना तोंडात ज्वलनशील पदार्थ कमी प्रमाणात घ्यायचे असतात, स्वतःलाच आग लागेल इतक्या प्रमाणात नाही, असं म्हटलं आहे. तर काहींनी हा व्हिडीओ फेक असल्याचा दावा केला आहे. व्यक्ती आगीसकटच पळत गेला त्यामुळे बहुतेक जण हैराण झाले आहेत. एका युझरने दिलेल्या माहितीनुसार हा ब्राझीलियन टीव्ही शोचा सीन आहे. हे वाचा - बापरे! हा चमत्कार की संकट? पाण्यासोबत आगही ओकतोय Hand pump; विचित्र घटनेचा Video तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.