Home /News /viral /

याला कोणीतरी आवरा रे! भावड्या गटारातच घर बांधून घेतोय बीचवरचा अनुभव; पाहा VIRAL VIDEO

याला कोणीतरी आवरा रे! भावड्या गटारातच घर बांधून घेतोय बीचवरचा अनुभव; पाहा VIRAL VIDEO

Viral Video: जगभरात लोकांची घरं जमिनीवर असतात, पण एका तरुणानं चक्क गटारीवर आपलं घर बांधलं (man Built home in gutter) आहे.

  नवी दिल्ली, 05 सप्टेंबर: जगभरात लोकांची घरं जमिनीवर असतात, पण एका तरुणानं चक्क गटारीवर आपलं घर बांधलं (man Built home in gutter) आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेलं, परंतु याचा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीनं आपलं घर गटारीत बांधलं आहे. एवढचं नव्हे तर तो स्ट्रॉचा वापर करत गटारीतील पाणी पित आहे. एखाद्या समुद्रकिनारी सन बाथ घेत असल्याचा त्याचा हा थाट सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ फनी रील्स व्हिडीओज या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, संबंधित व्यक्तीनं एका गटारीवर आपलं घरं बांधलं आहे. त्याच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी दिसत आहेत, जसं त्याची चप्पल, कपडे आणि इतर साहित्य. गंमतीचा भाग म्हणजे हा व्यक्ती स्ट्रॉ चा वापर करून गटारीतील पाणी पिताना दिसत आहे. तसेच गटारीच्या मध्यभागी खाट टाकून विश्रांती घेत आहे. त्यानं उभारलेल्या या छोट्याशा घरात एक लाईट सुद्धा आहे.
  हेही वाचा-'लोकांसाठी Nude होणं मला आवडतं'; PPT द्वारे मुलीनं केला Secret जॉबचा खुलासा शेअर केलेल्या संबंधित व्हिडीओमध्ये बँकग्राऊंडला आस्था गिल आणि बादशाहाचं 'पानी पानी हो गई' हे गाणं जोडलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आणखीच मजेशीर बनला आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत असून नेटकरी मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. हेही वाचा-VIDEO: भोगा कर्माची फळं; खाण्यावरून मस्करी करणाऱ्या तरुणाला मांजरीनं शिकवला धडा एका इन्स्टाग्राम वापरकर्त्यानं प्रतिक्रिया देताना लिहिलं की, 'या व्यक्तीला घर बांधण्यासाठी आणखी वेगळी जागा मिळाली नाही का?' दुसऱ्या एका वापरकर्त्यानं चिंता व्यक्त करत लिहिलं की, 'गरीबाचं घर वाहून जाऊ नये फक्त'. या व्हिडीओवर अनेकांनी मीम्सद्वारे देखील भाष्य केलं आहे. हा मजेशीर व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर वेगानं व्हायरल होतं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Video viral

  पुढील बातम्या