Home /News /viral /

भोगा कर्माची फळं; खाण्यावरून मस्करी करणाऱ्या तरुणाला मांजरीनं शिकवला धडा, पाहा मजेशीर VIDEO

भोगा कर्माची फळं; खाण्यावरून मस्करी करणाऱ्या तरुणाला मांजरीनं शिकवला धडा, पाहा मजेशीर VIDEO

Viral Video: मांजरीची खोड काढणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मांजरीनं संबंधित तरुणाला चांगला धडा शिकवला आहे.

    मुंबई, 05 सप्टेंबर: गोंडस मांजरींचे विविध प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत (Cat Viral Video) केले जातात. याच कारणामुळे मांजरींचे काही व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. काही लोकांना तर मांजरी खूपच आवडतात. असे लोकं केवळ मांजरीचं पालनपोषण करत नाहीत, तर त्यांच्यासोबत सुंदर आठवणीही तयार करतात. असं असलं तरी असेही काही लोक असतात, जे मांजरींची खोड काढण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. अशातच मांजरीची खोड काढणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यात मांजरीनं संबंधित तरुणाला चांगला धडा शिकवला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण खुर्चीवर बसलेला दिसत आहे. त्याचवेळी, मांजर त्याच्या खांद्यावर येऊन बसली आहे. दरम्यान, संबंधित तरुण चमच्यानं मांजरीला अन्न देण्याचं नाटक करतो. आणि ऐनवेळी ते अन्न मांजरीला न देता स्वत: खाण्याचा प्रयत्न करतो. पण तरुणानं काढलेली खोड मांजरीला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ती ताबडतोब आपल्या पंजानं चमच्याला मारते आणि अन्न खाली पाडते हेही वाचा-VIDEO: कोंबड्यासोबत पंगा घेणं भोवलं; तरुणाची झाली भलतीच फजिती, अक्षरशः फुटला घाम @buitengebieden_  युजरनेम असणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित वापरकर्त्यानं हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिलं आहे की, 'माणूस याच लायकीचा आहे'. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काही वेळातचं वेगानं व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडीओला 71 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर जवळपास पाच हजार लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. हेही वाचा-OMG! लहान मुलासारखाच रडू लागला हा पक्षी; आवाज ऐकूनच बसेल मोठा झटका या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान एका ट्विटर वापरकर्त्यानं कमेंट केली की, मांजरींना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही जितकं त्यांना हुशार समजता, त्याहून अधिक हुशार मांजरी असतात. त्याचवेळी एकानं लिहिलं की, हे कर्म आहे. तुम्ही जर मांजरीशी पंगा घेतला तर त्यांचा एक पंजाच पुरेसा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cat, Viral video.

    पुढील बातम्या