Home /News /viral /

लग्नाआधी प्रेयसीने स्वतःचं घर घेतल्यानं प्रियकरानं तोडलं नातं; संपूर्ण प्रकरण जाणून बसेल धक्का

लग्नाआधी प्रेयसीने स्वतःचं घर घेतल्यानं प्रियकरानं तोडलं नातं; संपूर्ण प्रकरण जाणून बसेल धक्का

मुलीने सांगितलं की, ‘लग्नापूर्वी मी स्वतःचं घर खरेदी केल्यामुळे माझा प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी माझ्याशी नातं तोडलं. होय, मुलीनी सेटल होऊन तिचं घर विकत घेणं, प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांना आवडलं नाही.

मुंबई 30 जुलै : कपल्स (Couples) लग्नाआधी अनेक प्रकारचं प्लॅनिंग करतात. घर (Home), चांगली नोकरी (Job) आणि सेटल झाल्यावरच दोघं लग्नाबद्दलचं नियोजन करतात. खरं तर कोणत्याही नात्यात दोघांचाही समान सहभाग असणं खूप गरजेचं असतं, तरच कोणतंही नातं दीर्घकाळ टिकतं. पण या नात्यात जोडीदाराच्या यशाबद्दल द्वेष आणि वाईट भावना येत असेल तर असं नातं तोडलेलंच बरं असं अनेकांना वाटतं. कारण, अशा नात्यांचं भविष्य उज्ज्वल नसतं. सोशल मीडियावर (Social Media) एका मुलीने तिच्या अशाच प्रियकराशी तुटलेल्या नात्याची गोष्ट शेअर केली आहे. मेहुणीचा साखरपुडा होताच ढसाढसा रडला दाजी; नवऱ्याचं सत्य समजताच प्रेग्नंट बायको हादरली तैवानमध्ये राहणाऱ्या या मुलीने फेसबुकवरील एका कन्फेशन पेजवर (Confession Page) तिची गोष्ट शेअर केली आहे. मुलीने सांगितलं की, ‘लग्नापूर्वी मी स्वतःचं घर खरेदी केल्यामुळे माझा प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी माझ्याशी नातं तोडलं. होय, मुलीनी सेटल होऊन तिचं घर विकत घेणं, प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांना आवडलं नाही. मी घर घेतलंय हे कळताच ते मला खूप बोलले आणि नंतर नातं तोडलं. महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाचे विचारही त्याच्या घरच्यांसारखेच निघाले. त्यालाही मी घर विकत घेणं पसंत नव्हतं, हा माझ्यासाठी सर्वांत मोठा धक्का होता,’ असं त्या मुलीने लिहिलंय. मुलीने फेसबुकवरील कन्फेशन पेजवर तिचं दुःख लोकांशी शेअर केलं आहे. तिने लिहिलंय की, ती 28 वर्षांची आहे आणि तिचा पगार महिन्याला सुमारे दीड लाख रुपये आहे. काही दिवसांआधी तिने कर्ज (Loan) काढून घर घेतलं. महिन्याला लाख रुपये ती कर्जाचा हप्ता भरत आहे. ते कर्ज ती एकटीच स्वतःच्या कमाईतून भरते. घर खरेदीसाठी पैसे हवे असल्याने तिने प्रियकराशी याबद्दल चर्चा केली नाही; पण तिच्या प्रियकराला घर खरेदीची माहिती मिळताच तो चांगलाच रागावला आणि यामुळे त्याने तिच्याशी नातंही तोडलं. ऐकावं ते नवल! कंपनीने बनवला असा आईस्क्रीम,31अंश सेल्सिअस तापमानातही वितळणं कठीण मुलाच्या घरच्यांनीही मुलीला घर खरेदीबाबत अनेक प्रश्न विचारले. मुलाचं स्वतःचं घर असताना तिने घर घेण्याची काय गरज होती, अशी विचारणा त्यांनी केली. दरम्यान, मुलीने नेटकऱ्यांशी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, हे सर्व लग्नापूर्वी घडलं हे चांगलं झालं. जो मुलगा तिची प्रगती सहन करू शकत नाही त्याच्यबरोबर ती आनंदी राहू शकणार नाही, हे तिला आता समजलंय. या पोस्टवर अनेकांनी मुलीला पाठिंबा दिला आणि असं नातं तुटलं तर त्यात वाईट वाटून घेण्याची गरज नाही, असंही काहींनी म्हटलंय. तसंच लग्नाआधीच मुलीला हे सर्व काही कळलं, ते बरं झालं नाहीतर अशा मुलाबरोबर आयुष्य घालवणं खूप कठीण झालं असतं, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी त्या पोस्टवर दिल्या आहेत.
First published:

Tags: Couple, Viral news

पुढील बातम्या