मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मेहुणीचा साखरपुडा होताच ढसाढसा रडला दाजी; नवऱ्याचं सत्य समजताच प्रेग्नंट बायको हादरली

मेहुणीचा साखरपुडा होताच ढसाढसा रडला दाजी; नवऱ्याचं सत्य समजताच प्रेग्नंट बायको हादरली

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

मेहुणीच्या साखरपुड्यानंतर रडू कोसळलेल्या व्यक्तीने आपल्या बायकोला असं सत्य सांगितलं ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 29 जुलै : घरातील लेक जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा घरातील प्रत्येक सदस्याला रडू येतं. पण हा क्षण शक्यतो लग्नाअखेर जेव्हा मुलीची सासरी पाठवणी केली जाते तेव्हा असतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक व्यक्ती आपल्या मेहुणीच्या साखरपुड्यालानंतर ढसाढसा रडली. त्याच्या रडण्यामागील कारण जेव्हा त्याच्या बायकोला समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

एका महिलेने सोशल मीडिया रेडिटवर आपल्या पतीबाबत सांगितलं. महिलेच्या पोस्टनुसार, तिच्या बहिणीच्या साखरपुड्यानंतर तिचा नवऱ्याचं वागणं खूप बदललं. तो रडू लागला. त्यानंतर दारूच्या नशेत त्याने याचं कारणही सांगितलं. प्रेग्नंट बायकोसमोरच त्याने धक्कादायक खुलासा केला. पतीने असं सत्य सांगितलं ज्यामुळे महिलेला मोठा झटका बसला. हे वाचा - Yuck! 'डोळे-कान-नाकातील घाण काढतो आणि...', BF च्या विचित्र सवयीला वैतागली GF; सोशल मीडियावर मागितली मदत महिलेने सांगितल्यानुसार तिची बहीण एका तरुणाला डेट करू लागली जे तिच्या नवऱ्याला बिलकुल आवडलं नाही. त्याने आपल्या पत्नीला तो तरुण तुझ्या बहिणीसाठी ठिक नाही, असंसुद्धा सांगितलं. पण तरी महिलेच्या बहिणीचं आणि त्या तरुणाचं नातं कायम होतं. एके रात्री महिला, तिचा नवरा, महिलेची बहीण आणि तिचा बॉयफ्रेंड चौघंही जेवायला गेले. जिथं महिलेच्या बहिणीला तिच्या बॉयफ्रेंडने प्रपोज केलं. त्यांनी साखरपुडा केला. यानंतर जेव्हा महिला आणि तिचा नवरा घरी आला तेव्हा तिचा नवरा एका खोलीत जाऊन ढसाढसा रडू लागला. नवऱ्याला असं रडताना पाहून तिने त्याला याचं कारण विचारलं. तेव्हा त्याने तिला तो तिच्या बहिणीवर खूप प्रेम करत असल्याचं सांगितलं. आपण करत आहोत ते चुकीचं आहे. आता आपण यापुढे एक चांगला नवरा आणि चांगले वडील बनून दाखवणार असं वचनही त्याने दिल्याचं महिलेने सांगितलं. हे वाचा - प्रेमी जोडप्याची न्यूड होऊन भटकंती; महिला म्हणते, कपडे असल्यावर अस्वस्थ वाटतं
पण आपल्या बहिणीवर नवऱ्याचं असलेलं एकतर्फी प्रेमाचं सत्य समजल्यानंतर आता काय करावं आणि काय नाही हे तिला समजत नाही आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर पोस्ट करत लोकांकडून मदत मागितली आहे. त्यांचा सल्ला मागितला आहे.
First published:

Tags: Couple, Relationship, Viral, Viral news, Wife and husband

पुढील बातम्या