• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • हौसेला मोल नाही! श्वानासाठी मालकानं बुक केला विमानातील पूर्ण बिझनेस क्लास; मोजले इतके पैसे

हौसेला मोल नाही! श्वानासाठी मालकानं बुक केला विमानातील पूर्ण बिझनेस क्लास; मोजले इतके पैसे

या विमानाने मुंबईतून झेप घेतली आणि थोड्या वेळात ते चेन्नईला उतरलं. A320 प्रकारच्या या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये 12 सीट्स असतात. त्या दिवशी त्यापैकी केवळ दोनच सीट्स भरलेल्या होत्या

  • Share this:
नवी दिल्ली 20 सप्टेंबर : गेल्या बुधवारी सकाळी नऊ वाजता एअर इंडियाच्या (Air India) AI-671 या विमानाने मुंबईतून झेप घेतली आणि थोड्या वेळात ते चेन्नईला उतरलं. A320 प्रकारच्या या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये 12 सीट्स असतात. त्या दिवशी त्यापैकी केवळ दोनच सीट्स भरलेल्या होत्या; पण बुकिंग मात्र फुल होतं. त्या दोन सीट्ससाठीच अख्खा बिझनेस क्लास (Business Class) बुक करण्यात आला होता. त्या दोन सीट्सवरचे प्रवासी एकदम खास होते. एक कुत्रा आणि त्याचा मालक असे दोघे जण त्यातून प्रवास करत होते. आपल्या कुत्र्यासह आरामात आणि एकदम स्टाइलमध्ये प्रवास करता यावा म्हणून मालकाने अख्खा बिझनेस क्लासच बुक केला होता. तो कुत्रा माल्टिज स्नोई फरबॉल (Maltese Snowy Furball) जातीचा होता. मुंबई ते चेन्नई या प्रवासाचं एअर इंडियाचं बिझनेस क्लासचं एका व्यक्तीचं तिकीट सुमारे 20 हजार रुपये आहे. आपल्या कुत्र्याला न्यायचं म्हणून त्या व्यक्तीने अख्खा बिझनेस क्लास म्हणजेच 12 सीट्स बुक केल्या. त्यासाठी त्याला अडीच लाख रुपयांहून अधिक खर्च करावा लागला. पण हौशीला मोल नसतं, असं म्हणतात तेच खरं, याची प्रचिती या घटनेवरून आली. पाळीव प्राणी किंवा कुत्र्याने विमानातून प्रवास करणं ही गोष्ट आता काही नावीन्यपूर्ण राहिलेली नाही; मात्र श्वानप्रेमापोटी अख्खा बिझनेस क्लास बुक करणं म्हणजे प्रेमाची परिसीमाच झाली. आपल्या पाळीव कुत्र्यावर (Pet Dog Flown with Owner in Business Class) सर्वांत जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्ती अशी काही स्पर्धा घेतली, तर त्यात या व्यक्तीचा नंबर आघाडीवर असेल, यात काही शंका नाही. 'मी अजून जिवंत आहे'; सोशल मीडियावर निधनाचं वृत्त पाहून आमदारानं स्वतःच सत्य एअर इंडियाच्या विमान प्रवासाच्या धोरणानुसार (Air India In flight Policy) प्रवाशांना विमानात कुत्रे, मांजरं, पक्षी असे छोटे प्राणी आणि पक्ष्यांना आपल्यासोबत नेता येतं. अर्थात, त्यासाठी त्या प्राणी-पक्ष्यांच्या आरोग्याचं, तसंच रेबीज व्हॅक्सिनेशन झाल्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक असतं. एक प्रवासी आपल्यासोबत दोन पाळीव प्राण्यांना घेऊन प्रवास करू शकतो. प्राणी किती आकाराचा आहे, त्यानुसार त्याला प्रवासादरम्यान केबिनमध्ये ठेवलं जाणार की मालवाहतुकीच्या केबिनमध्ये ठेवलं जाणार हे ठरतं. प्रवासी बिजनेस क्लासमधून प्रवास करणार असतील, तर पाळीव प्राण्यांना केबिनच्या शेवटच्या रांगेत ठेवलं जातं. ज्या प्राण्यांना मालकाच्या भावनिक आधाराची कायम गरज असते, अशा प्राण्यांना सोबत घेऊन प्रवास करण्याची परवानगी अनेक विमान कंपन्या देतात. एकदा एक महिलेने आपली आई तिच्या पाळीव कांगारूला घेऊन विमान प्रवास करत असल्याचे फोटो शेअर केले होते. जोडी स्मॉली नावाच्या प्रवाशाबरोबर ईस्टर नावाच्या टर्की पक्ष्यानेही विमानप्रवास केल्याचं वृत्त 'सन यूके'ने दिलं होतं. अजबच! सासू-सासऱ्यांना सूनेवर नाही विश्वास; नातवाचा जन्म होताच केली DNA टेस्ट अन् गेल्या वर्षी कोरोना महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला होता, तेव्हा उड्डाणांवर काही निर्बंध होते. त्यावेळी प्राण्यांना त्यांच्या मालकांसोबत प्रवास करता येत नव्हता. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका सिंग नावाची उद्योजिका आणि सायबर सिक्युरिटी रिसर्चरने दिल्लीहून मुंबईला सहा पाळीव प्राणी विमानाने पाठवण्यासाठी पुढाकार घेतला होता. कोविड-19मुळे या पाळीव प्राण्यांची त्यांच्या मालकांपासून ताटातूट झाली होती.
First published: