मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Rock climbing करताना स्टंट पडला भारी! भल्यामोठ्या दगडाला धडकला तरुण आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Rock climbing करताना स्टंट पडला भारी! भल्यामोठ्या दगडाला धडकला तरुण आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

रॉक क्लायम्बिंग (Rock climbing) करताना दोरीला धरून तरुण झोके घेत होता आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून धडकीच भरेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 05 मार्च : काही लोकांना जीवघेणे करतब करायला, जीवघेणे खेळ खेळायला खूप आवडतं. त्यांना खतरों की खिलाडी बनत साहसी कृत्य करण्याच्या नादात ती आपला जीव धोक्यात घालत असतात (Dangerous Stunt Video). आधीच हे खेळ, कसरती धडकी भरवणाऱ्या असतात. त्यातही काही लोक स्टंट करायला जातात आणि त्याचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो, याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर एका खतरनाक स्टंटचा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. ज्यात एक तरुण रॉक क्लायबिंग करत आहे. याचवेळी तो भयानक स्टंट करतो. त्यानंतर तो धाडकन भल्यामोठ्या दगडाला आदळतो. पुढे जे घडतं ते धडकी भरवणारं आहे. व्हिडीओ पाहताच अंगावर अक्षरश: काटा येतो.

हे वाचा - हे भयानक आहे! हायवेवर इतका Dangerous Bike Stunt; धडकी भरवणारा Video

व्हिडीओत पाहू शकता हा तरुण दगडांवर आहे. तो रॉक क्लायम्बिंग करतो आहे. दोरीच्या मदतीने तो आपलं हे करतब दाखवतो आहे. त्याचवेळी तो एक स्टंट करायला जातो. दोरीला धरून दगडांवर झोके घ्यायला जातो आणि त्याचवेळी त्याचा तोल ढासळतो. त्यावेळी तो एका मोठ्या दडगडाला आपटतो आणि त्यानंतर तिथून जोरात खालच्या दिशेने कोसळतो.

View this post on Instagram

A post shared by Climb World (@climb_worlld)

या तरुणासोबत पुढे काय घडतं हे या व्हिडीओत दिसत नाही आहे. पण तो ज्या पद्धतीने कोसळला त्यानुसार त्याला भयंकर दुखापत नक्कीच झाली असावी.

हे वाचा - VIDEO-चिमुकल्या हातात धरली बंदूक आणि...; नेटकरी म्हणाले, 'मृत्यूशी खेळतोय मुलगा'

climb_worlld नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार हा तरुण पूर्णपणे ठिक आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Shocking video viral, Stunt video, Viral, Viral videos