मुंबई, 04 मार्च : मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणतात ना. लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. अगदी मोठ्या माणसांनाही जे शक्य नाही ते ही मुलं करून दाखवतात. सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याने असं काही करून दाखवलं आहे, जे पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे (Kid Sharp Shooter) . लहान मुलाने आपल्या चिमुकल्या हातात एक बंदूक धरली. त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. हातात बंदूक धरून त्याने केलेलं करतब कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता एक लहान मुलगा उभा आहे. हातात एक बंदूक आहे. बंदूक घेऊन तो निशाणा साधण्याच्या तयारीत आहेत. भिंतीवर असलेल्या ट्युब लाइट्सच्या दिशेने त्याने आपला निशाणा लावला आहे. टार्गेट फिक्स होताच तो लगेच फायर करतो. पहिलाचा निशाणा लावतो आणि लाइट्स जाते. हे वाचा - हे भयानक आहे! हायवेवर इतका Dangerous Bike Stunt; धडकी भरवणारा Video आता या मुलाच्या हातातील बंदूक खरीखुरी नव्हे तर खेळण्यातील आहे, हे तर तुम्हाला समजलंच असेल. पण या खेळण्यातील बंदुकीने हा होईना त्याने लावलेला नेम एखाद्या शार्प शूटरसारखा परफेक्ट आहे.
deo.hieukieugi नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. इतका लहान मुलगा इतका अचूक नेम कसा काय साधू शकतो, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हे वाचा - शिक्षक असावा तर असा! होमवर्क न करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीला ‘गोड शिक्षा’ यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी या मुलाचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून एका यूझरने ‘हा लहान मुलगा मृत्यूशी खेळत आहे’, अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘या छोट्या शार्पशूटरला घरात शाबासकी मिळेल की नाही माहिती नाही पण ट्युबलाइट फोडण्यासाठी त्याला ओरडा नक्की पडेल ही मी दाव्याने सांगतो’, असं म्हटलं आहे.