जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अजब शासन! चिमुकल्यांना चमच्याऐवजी हाताने भरवणं गुन्हा; कायदा मोडला तर मोठी कारवाई

अजब शासन! चिमुकल्यांना चमच्याऐवजी हाताने भरवणं गुन्हा; कायदा मोडला तर मोठी कारवाई

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

एका भारतीय दाम्पत्याकडून त्यांच्या मुलांना हातांनी भरवलं, त्यांच्यासोबत झोपवलं म्हणून हिसकावून घेण्यात आलं आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी : घरात चिमुकला पाहुणा आला की फक्त त्याचे आईवडिलच नव्हे तर घरातील सर्व कुटुंबाला आनंद होतो. आजी-आजोबा, काका-काकी, मावशी, आत्या सर्व नातेवाईकांना त्या बाळासाठी काय करू आणि काय नको असं होतं. आपल्या इथं तर लहान मुलांना आपल्या हातांनी प्रेमाने भरवलं जातं. पण मुलांना हातांनी भरवणं हा गुन्हा आहे, असं तुम्हाला सांगितलं तर… काय आश्चर्य वाटलं ना. इतकंच नव्हे तर आपल्या इथं लगान मुलं पालकांसोबत झोपतात. पण पालकांनी मुलांसोबत झोपणं हासुद्धा गुन्हा आहे. लहान मुलांच्या पालनपोषणाबाबत या विचित्र कायद्यांबाबत तुम्हाला माहिती आहे का? 2011 सालातील हे प्रकरण आहे. अनुरूप भट्टाचार्य आणि त्यांची पत्नी सागरिका या दाम्पत्याला दोन मुलं. मोठा मुलगा अविज्ञान तीन वर्षांचा आणि दुसरी मुलगी ऐश्वर्या एक वर्षाची होती. हे दाम्पत्य आपल्या मुलांना खूप प्रेम करत होते. पण एक दिवस प्रशासनाचे अधिकारी त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन गेलं. कारण काय तर हे पालक आपल्या मुलांना हातांनी भरवत होतं, त्यांना आपल्यासोबतच झोपवत होते, त्यांना चांगले कपडे घालत नव्हतं, त्यांच्याकडे मुलांना खेळायला पुरेशी जागाही उपलब्ध नव्हती. VIDEO - लेकाला निरोप देताना बाबांना आलं गहिवरून; आधी मुलाला गाडीत बसवलं, नंतर त्याच ट्रेनसमोर वडील… आता अशी कारणं वाचून तुम्ही हैराण झाला असाल. यात गुन्हा काय असं तुम्ही म्हणाल. तर एक असा देश आहे, जिथं हातांनी भरवणं म्हणजे जबरदस्ती खायला देणं मानलं जातं, मुलांना पालकांनी आपल्यासोबत एकाच बेडवर झोपवणंही कायद्याने मान्य नाही. असा कायदा कुठे आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा विचित्र कायदा आहे नॉर्वेत. नॉर्वेत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालकल्याण सेवा आहे, जी खूप प्रभावी आहे. प्रत्येक महापालिकेत ही सेवा आहे. देशातील मुलांना चांगलं आरोग्य आणि सेवा मिळाव्यात हा या संस्शेचा उद्देश आहे. जर मुलांना ते िमळालं नाही तर ही संस्था त्या मुलांना आपल्या ताब्यात घेते. भले त्या मुलांची काळजी त्यांचे आईबाबा घेत असले तरी. कस्टडीनंतर या मुलांना ती 18 वर्षांची झाल्यानंतरच त्यांना सोडलं जातं. तेव्हाच आईवडिल त्या मुलाचा चेहरा पाहू शकतात. मुलांचं संगोपन करताना ‘या’ चुका टाळाव्यात; नाहीतर मुलं होऊ शकतात हट्टी नॉर्वेतील या कायद्याचा फटका बसला तो अनुरूप-सागरिका या भारतीय दाम्पत्याला. अखेर हे प्रकरण नॉर्वे आणि भारत सरकारपर्यंत पोहोचलं. भारताच्या हस्तक्षेपानंतर नॉर्वेतील प्रशासनाने या मुलांची कस्टडी त्यांच्या काकांना दिली आणि त्यांना भारतात घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. मुलांपासून दूर झाल्यानंतर पती-पत्नीत भांडणं होऊ लागली. सागरिकाने मुलांच्या कस्टडीसाठी मोठा लढा लढला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात