जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Mahindra Thar Tata Nano Accident: महिंद्रा थार आणि टाटा नॅनोची टक्कर, त्यानंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

Mahindra Thar Tata Nano Accident: महिंद्रा थार आणि टाटा नॅनोची टक्कर, त्यानंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

व्हायरल

व्हायरल

सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडीओ फिरत असतात. लहान अपघातांपासून ते मोठ्या अपघातांपर्यंतचे सर्वच व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडीओ फिरत असतात. लहान अपघातांपासून ते मोठ्या अपघातांपर्यंतचे सर्वच व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळतात. अशातच आणखी एक अपघाताची बातमी समोर आली असून सध्या याची चांगलीच चर्चा रंगली आहे. छत्तीसगडमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील दुर्ग शहरात महिंद्रा थार आणि टाटा नॅनोची टक्कर झाली. हे दृश्य पाहून लोक थक्क झाले. टाटा नॅनोच्या झालेल्या अपघातानंतर महिंद्रा थार रस्त्यावर उलटलेली दिसली. टाटा नॅनोचा पुढील भाग खराब झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. हेही वाचा -  बेडवर बसून सापांसोबत खेळताना दिसली महिला, Video पाहून अंगावर येईल काटा या अपघाताचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महिंद्रा थार रस्त्यावर उलटा पडलेला दिसतो. टाटा नॅनोचे इंजिन मागील बाजूस असल्यामुळे त्याचे फारसे नुकसान झाले नाही. या अपघातानंतर रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पद्मनाभपूर चौकी दुर्गच्या टीआयने सांगितले की, ही घटना पद्मनाभपूर मिनी स्टेडियमजवळ दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. या अपघातात टाटा नॅनो आणि महिंद्रा थार एकमेकांवर आदळली, त्यानंतर थार उलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. दोन्ही वाहनांच्या मालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, असे अपघाताचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेक विचित्र, भयंकर प्रकारचे अपघात घडत असतात. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात