जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बेडवर बसून सापांसोबत खेळताना दिसली महिला, Video पाहून अंगावर येईल काटा

बेडवर बसून सापांसोबत खेळताना दिसली महिला, Video पाहून अंगावर येईल काटा

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

साप हा सर्वात धोकादायक आणि भितीदायक प्राण्यांपैकी एक आहे. फक्त त्याला पाहिलं तरी भल्याभल्यांना घाम फुटतो मग त्याला हात लावणं तर दुरचीच गोष्ट.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : साप हा सर्वात धोकादायक आणि भितीदायक प्राण्यांपैकी एक आहे. फक्त त्याला पाहिलं तरी भल्याभल्यांना घाम फुटतो मग त्याला हात लावणं तर दुरचीच गोष्ट. मात्र काही लोक असेही आहेत ज्यांना साप पाळण्यामध्ये जास्त रस आहे. अगदी काही जणांच्या घरी साप पहायला मिळतात. सध्या अशाच एका महिलेचे व्हिडीओ समोर आलाय जिला सापांची आवड आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. नुकताच सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला सापांसोबत खेळताना आणि त्यांना सांभाळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला तिच्या पलंगावर बसलेल्या सापांना तिचे पाळीव प्राणी असल्यासारखे गोंजारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून मात्र भीतीदेखील वाटत आहे की साप महिलेला चावणार तर नाही ना?

जाहिरात

Sunita Bai या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर खूप सारे लाईक्स आणि प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अनेकांनी पाहूनच भीती वाटत असल्याच्या कमेंट केल्या आहेत. याशिवाय महिलेने तिचे आणखी काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सापांसोबत खेळताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिला खुर्चीवर बसलेली दिसत आहे. यादरम्यान दोन काळ्या रंगाचे धोकादायक विषारी साप त्याच्या गळ्यात लपेटलेले दिसतात.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सापासोबत असे धोकादायक भितीदायक स्टंट करणे खूपच भयानक असून सावधिगी बाळगली नाही तर गंभीर इजा होऊ शकते. सापच नाही तर इतर धोकादायक प्राण्यांनाही काही लोकांची पाळण्याची इच्छा असते. असे खतरनाक अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात