मराठी बातम्या /बातम्या /Viral /सलग 13 वर्ष खासदार आणि भारतातील सर्वात सुंदर महिला होत्या गायत्री देवी; , या कारणामुळे तिहार जेलमध्ये होत्या कैद

सलग 13 वर्ष खासदार आणि भारतातील सर्वात सुंदर महिला होत्या गायत्री देवी; , या कारणामुळे तिहार जेलमध्ये होत्या कैद

1962 ते 1975 या काळात महाराणी गायत्री देवी सलग खासदार होत्या. 1962 मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्षाच्या तिकिटावर प्रथमच निवडणूक लढविली आणि काँग्रेसच्या उमेदवार शारदी देवी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला

1962 ते 1975 या काळात महाराणी गायत्री देवी सलग खासदार होत्या. 1962 मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्षाच्या तिकिटावर प्रथमच निवडणूक लढविली आणि काँग्रेसच्या उमेदवार शारदी देवी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला

1962 ते 1975 या काळात महाराणी गायत्री देवी सलग खासदार होत्या. 1962 मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्षाच्या तिकिटावर प्रथमच निवडणूक लढविली आणि काँग्रेसच्या उमेदवार शारदी देवी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला

जयपूर 29 जुलै : जयपूरच्या महाराणी गायत्री देवी (Maharani Gayatri Devi) यांची आज पुण्यतिथी आहे. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये (Tihar Jail) राहाणाऱ्या गायत्री देवी या सर्वात सुंदर महाराणी होत्या. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्या अनेकदा टीका करत असत. आणीबाणीच्या (Emergency) वेळी महाराणी गायत्री देवींला अटक करण्यात आली होती. स्वातंत्र्य पक्षाचा उमेदवार म्हणून त्या काँग्रेसविरोधात (Congress) निवडणूक लढवत असे.

असं म्हटलं जातं, की महाराणी गायत्री देवी या एक असाधारण महिला होत्या. सुंदर असण्यासोबतच त्या अतिशय बुद्धीमानही होत्या. महाराणी गायत्री देवी यांचं नाव Vogue मॅगजीनच्या सर्वात सुंदर 10 महिलांच्या यादीत सामील होतं.

शर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला

1962 ते 1975 या काळात महाराणी गायत्री देवी सलग खासदार होत्या. 1962 मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्षाच्या तिकिटावर प्रथमच निवडणूक लढविली आणि काँग्रेसच्या उमेदवार शारदी देवी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यांना 250,272 पैकी 192,909 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ 35,217 मते मिळाली. इतक्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं.

महाराणी गायत्री देवी यांचा जन्म लंडन, युनायटेड किंगडममध्ये 23 मे 1919 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जितेंद्र नारायण आणि आईचे नाव इंदिरा देवी होतं. महाराणी गायत्री देवीचे वडील बंगालमधील कूचबिहारचे राजा होते. महाराणी गायत्री देवीचे लग्न जयपूरच्या महाराजा सवाई मान सिंह II यांच्यासोबत 9 मे 1940 रोजी झाले होते.

Instagram कडून या युजर्ससाठी मोठे बदल, तुम्हीही या लिस्टमध्ये नाही ना?

महाराणी गायत्री देवी जवळजवळ 5 महिने दिल्लीच्या तिहार कारागृहात कैदेत होत्या. आणीबाणीच्या काळात त्यांना अघोषित मालमत्तेच्या आरोपाखाली 1975 मध्ये अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सुमारे 1 वर्षानंतर त्या राजकारणातून निवृत्त झाल्या.

First published:
top videos

    Tags: Beauty queen, Tihar jail