• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • शर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न

शर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sharlyn Chopra) राजवर हे आरोप लावले आहेत. दरम्यान सुरुवातीच्या काळापासूनच शर्लिन या प्रकरणात आहे.

 • Share this:
  मुंबई 29 जुलै:  राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरणात प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. तर राजच्या अडणींतही दिवसेनंदिवस वाढ होताना दिसतेय. नुकतीच कोर्टाने राजची याचिकाही फेटाळली होती. तर आणखी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर आता त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sharlyn Chopra) राजवर हे आरोप लावले आहेत. दरम्यान सुरुवातीच्या काळापासूनच शर्लिन या प्रकरणात आहे. फेब्रुवारी महिन्यात राजवर दाखल एफआयआर वेळी शर्लिनने तिचा जवाब नोंदवला होता. तर आता पुन्हा एकदा शर्लिनने क्राइम ब्रँचला तिच्यावर अत्याचार झाला असल्याची माहिती दिली आहे.

  निक नाही तर या व्यक्तीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय प्रियांका; लंडनमध्ये करतेय एन्जॉय

  तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2019 साली सुरुवातीला राज कुंद्राच्या बिजनेस मॅनेजरने एका प्रस्तावासाठी चर्चा करण्यासाठी तिला बोलवलं होतं. 27 मार्च 2019 ला बिजनेस मीटिंग नंतर एक मोठा विवाद झाला ज्यानंतर राज तिला काहीही नं सांगताच तिच्या आला होता. पुढे तिने सांगितलं की, त्यावेळी राजने तिला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा ती विरोध करत होती, तिचं म्हणणं आहे की एका विवाहीत पुरूषाशी तिला संबध ठेवायचे नव्हते. तसेच बिजनेसला एन्जॉयमेंटशी जोडायचंही नव्हतं. तिने सांगितलं की, राजचा विरोध केल्यानंतरही तो थांबत नव्हता. त्यामुळे ती फारच घाबरली होती. काही वेळानंतर तिने त्याला धक्का दिला व ती वॉशरुमध्ये गेली.

  HBD: संजय-माधुरीमध्ये कशामुळे आला दुरावा? धकधक गर्ल आजही आहे संजूबाबाची फेव्हरेट

  शर्लिननेची ही तक्रार मुंबई क्राइम ब्रँचकडे गेली आहे. त्यामुळे आता रजा कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. याआधी मॉडेल पुनम पांडेने देखील राज कुंद्रावर तिचा प्रायव्हेट नंबर लिक केल्याचा आरोप केला होता. तर 2019 मध्ये तिने तिने हा आरोप केला होता. याशिवाय अन्य काही मॉडेल्सनी ही राजवर आरोप लावले होते. व फसवणून करूण अश्लिल चित्रपटांत काम करण्या भाग पाडल्याचेही आरोप त्याच्यावर आहेत.
  Published by:News Digital
  First published: