काही दिवसांपूर्वी मेट्रोत घुसलेल्या मंजुलिकाला पाहून सर्वांना धडकी भरली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रोतील हा व्हिडीओ. सुरुवातीला सर्वांना हे इन्स्टा रिल वाटलं म्हणून सर्वांनी शेअर केलं. मेट्रोत मंजुलिकाच्या रूपात दिसलेल्या या व्हिडीओतील तरुणीचं खरं नाव आहे प्रिया गुप्ता. प्रिया मूळची उत्तर प्रदेशच्या बरेतीलील. बरेलीतच तिनं आपलं सुरुवातीचं शिक्षण केलं आणि पुढील शिक्षणासाठी ती गाझियाबादमध्ये आली. न्यूज 18 लोकलशी बोलताना प्रिया म्हणाली, ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. पण तिला अॅक्टिंग आणि मॉडलिंगची आवड होती. रिअल लाइफमध्ये ती एक डॉक्टर आहे. तिने गाझियाबादमध्ये फेजिओथेरेपीचा कोर्स केला. सोबतच ती वेळ मिळेल तसं अॅक्टिंग आणि मॉडेलिंगचीही प्रॅक्टिस करते. सहा वर्षांपासून अॅक्टिंग, मॉडलिंगही करते आहे. तिने बऱ्याच वेब सीरिज आणि टीव्ही अॅडमध्ये काम केलं आहे. आणखी मोठ्या प्रोजेक्टवर ती काम करत आहे. व्हायरल झालेला तिचा हा व्हिडीओ 22 डिसेंबरला एका अॅडच्या शूटचा आहे. त्यातील छोटासा भाग कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला.