सेल्फीचा मोह अगदी प्राण्यांनाही आवरलेला नाही. जंगलात एका अस्वलाने काढलेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (प्रतीकात्मक फोटो)
2/ 8
जंगलात निरीक्षणासाठी ठेवलेला कॅमेरा अस्वलाच्या हाती लागलं. जसं अस्वल कॅमेरासमोर आलं तसा त्याने आपला जलवा दाखवला. (फोटो सौजन्य - ट्विटर)
3/ 8
अगदी हटके अॅटिट्युड, वेगवेगळ्या पोझ देत वेगवेगळ्या अँगलने अस्वलाने सेल्फी काढले आहेत. फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. (फोटो सौजन्य - ट्विटर)
4/ 8
बोल्डर ओपन स्पेस आणि माउंटन पार्क्स ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य - ट्विटर)
5/ 8
ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार जंगलात निरीक्षणासाठी ठेवल्या जाणाऱ्या वाइल्ड लाइफ कॅमेऱ्यात 580 फोटो होते. त्यात 400 सेल्फी या अस्वलाचे होते. (फोटो सौजन्य - ट्विटर)
6/ 8
दरम्यान यासोबत पार्कस कॅनडानेही पोल बिअर्सचे सेल्फी शेअर केले. कॅनडाच्या वापुस्क नॅशनल पार्कमधील पोल बिअरचे हे सेल्फी. (फोटो सौजन्य - ट्विटर)
7/ 8
यातही हे अस्वल कॅमेऱ्यामध्ये पाहत वेगवेगळ्या पोझ देताना दिसतं आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)
8/ 8
अस्वलाचे हे सेल्फी तुम्हाला कसे वाटले आणि त्यातला तुमचा फेव्हरेट सेल्फी कुठला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (फोटो सौजन्य - ट्विटर)