छेड काढणाऱ्याला महिलेनं शिकवली चांगलीच अद्दल; आधी झाडाला बांधलं आणि मग... VIDEO VIRAL

छेड काढणाऱ्याला महिलेनं शिकवली चांगलीच अद्दल; आधी झाडाला बांधलं आणि मग... VIDEO VIRAL

या व्यक्तीला महिलेनं असा धडा शिकवला की पुन्हा छेड काढण्याचं दूर तो महिलांकडे वाकड्या नजरेनं पाहणारही नाही.

  • Share this:

अजहर खान/भोपाळ, 15 ऑक्टोबर : एकटी समजून एका महिलेची घरात घुसून तिची छेड काढणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. त्याने विचारही केला नसेल, अशी अवस्था या महिलेनं त्याची केली. रात्रीच्या वेळेला दारूच्या नशेत घरात घुसून त्याने महिलेची छेड काढली आणि मग महिलेनंही त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. आधी त्याला एका झाडाला बांधलं आणि मग धू धू धुतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) झाला आहे.

ही घटना आहे मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) बालाघाटमधली (balaghat). अचनाकपूर गावात एक व्यक्ती रात्री दारूच्या नशेत एका घरात घुसला. त्या घरात एक महिला एकटीच होती. महिलेला एकटं पाहून तो तिला छेडू लागला. एक बेवडा अचानक घरात घुसून छेडू लागल्यानंतर महिलेनं आरडाओरडा सुरू केला. तिनं आपल्या नातेवाईकांना बोलावलं. तिचा आवाज ऐकून नातेवाईकही तात्काळ धावून आले. शिवाय गावातील लोकही जमले.

लोक जमा होताच दारूच्या नशेत असलेला व्यक्ती घाबरला आणि तिथून तो पळू लागला. पण त्याचा पळण्याचा प्रयत्न फसला. त्याची तिथून काही सुटका झाली नाही. त्याला सर्वांनी मिळून पकडलंच. महिलेनं सर्वांच्या मदतीने त्याला बांधलं. इतक्यावरच ती थांबली नाही तर तिनं त्याला चांगलाच चोप दिला.

हे वाचा - अमानुषतेचा कळस! कुत्र्याला मारहाण करतानाचा आणखी एक VIDEO समोर

यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. मात्र ही संपूर्ण घटना घडत असताना तिथल्या काही लोकांनी त्याचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ समोर येताच सर्व जण महिलेचं कौतुक करत आहेत. तिच्या हिमतीला दाद देत आहेत.

याआधीदेखील राजस्थानमध्ये एका तरुणीची छेडछाड काढणाऱ्या तरुणाला अशीच ऑन द स्पॉट शिक्षा देण्यात आली. त्या तरुणालादेखील  झाडाला बांधून बेदम मारहाण केली. तिथं असलेल्या सर्व महिलांनी त्याला झाडाला बांधून चपलेलनं मारलं. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हे वाचा - डोळ्यांवर पट्टी, हातात हातोडा; व्यक्तीभोवती पसरलेले नारळ फोडतानाचा थरारक VIDEO

शिवाय काही दिवसांपूर्वीच पत्नीने आपल्या वेबड्या पतीला घरात एका खांबला मारून काठीने चोपलं होतं. पत्नीशी खोटं बोलून तो दारू पिऊन आला आणि मग तिचा पारा असा चढला की तिनं नवऱ्याचे हातपाय बांधून त्याला एका खांबाला बांधलं आणि कपड्यासारखं त्याला धुवून काढलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र ही घटना कुठली होती ती माहिती नाही.

Published by: Priya Lad
First published: October 15, 2020, 7:44 AM IST

ताज्या बातम्या