ठाणे, 13 ऑक्टोबर : पंजाबच्या (punjab) लुधियानामध्ये (ludhiana) कुत्र्याला मारून मारून (dog beaten) त्याची हत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता महाराष्ट्रातही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एक व्यक्ती कुत्र्याला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
@streetdogsof ट्वीटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याला किती अमानुषतेने मारत असल्याचं दिसतं आहे. ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ अंबरनाथच्या बुवा पाड्यातील आहे.
— Streetdogsofbombay #Feedastrayeveryday (@streetdogsof) October 11, 2020
व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावरील एका कुत्र्यावर ही व्यक्ती काठीने वार करत राहते. त्या कुत्र्याच्या तोंडावरही काठी मारताना दिसते आहे. या व्यक्तीने या कुत्र्याला इतकं मारलं की कुत्र्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या नाकातून रक्त आल्याची माहितीही या ट्विटमध्ये देण्यात आली आहे. हा व्हिडीओ राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलिसांनाही टॅग करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच लुधियानामध्ये एका सुरक्षारक्षकाने एका भटक्या कुत्र्याला इतकं मारलं की दुसऱ्या दिवशी त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. 6 ऑक्टोबरच्या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सुरक्षारक्षकाविरोधात प्राणीप्रेमींनी आंदोलन छेडलं. त्याच्याविरोधात कारवाईची मागणी होऊ लागली. आता या सुरक्षारक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली असल्याची माहितीदेखील मिळते आहे.
काही लोक तर आपल्या मजेसाठी आणि प्रसिद्धीसाठी या मुक्या जीवांचा छळ करतात. ऑगस्टमध्येच एका असा व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये एक तरुणी एका कुत्र्याला आधी दोन पायांवर चालवते त्याचा खेळ करते आणि मग गरागरा फिरवून त्याला रस्त्यावर फेकून देते. हरयाणाच्या चरखी दादरी इथली ही घटना होती.
याआधीदेखील अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. फक्त कुत्राच नव्हे अशा बऱ्याच मुक्या जीवांच्या जीवाशी खेळ केला जातो. असे बरेच संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर Viral झाले आहेत.