मुंबई, 14 ऑक्टोबर : आतापर्यंत डोक्यावर एखादं फळ ठेवून बंदुकीने निशाणा साधल्याचं तुम्ही पाहिलं आहे. असाच धडकी भरवणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून हातात हातोडा घेऊन नारळ फोडले (smashing coconut) जात आहेत. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष तर हे नारळ हातात घेऊन फोडले जात नाहीत तर जमिनीवर झोपलेल्या एका व्यक्तीच्या आजूबाजूला पसरवण्यात आले आहेत.
आंध्र प्रदेशच्या नेरोल्लातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षक पी प्रभाकर रेड्डी (Prabhakar Reddy P) आणि त्यांचा प्रशिक्षणार्थी राकेश बोइला (Rakesh B ) यांनी डोळे बंद करून असं काही करून दाखवलं जे आपण उघड्या डोळ्यांनी करण्याची साधी कल्पनाही करू शकत नाही.
व्हिडीओत पाहू शकता पी प्रभाकर रेड्डी यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, त्यांना यातून अजिबात दिसत नाहीये. यानंतर त्यांच्या एक प्रशिक्षणार्थी जमिनीवर झोपला आहे, त्याच्या आजूबाजूला काही नारळ पसरवण्यात आले आहेत. रेड्डी आपल्या हातात हातोडा घेतात आणि हे नारळ फोडायला सुरुवात करतात. बरं असं नाही की हळूहळू वेळ घेऊन नाही तर पटापट नारळांवर हातोडा मारत जात आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांनी एका मिनिटांत एक ना दोन तर तब्बल 49 नारळ फोडलेत.
रेड्डी जोर लावून हातोड्याने नारळ फोडत आहेत. त्यांचा निशाणा थोडा जरी चुकला असता तरी राकेशच्या जीवावर बेतलं असतं. राकेशच्या हिमतीलाही दाद द्यायला हवी. तोदेखील न घाबरता अजिबात न हलता तसाच झोपून राहिला. आपल्या गुरूवर त्याचा पूर्णपणे विश्वास होता.
हे वाचा - दिव्यांगाच्या स्वप्नासाठी धडपड; तिला पाठीवर घेऊन त्याने सर केलं सर्वोच्च शिखर
आपण गेल्या 6 महिन्यांपासून याचा सराव करत होतो. अनेकदा आम्हाला अपयशही आलं मात्र आम्ही हार मानली नाही. आमचं लक्ष्य 35 नारळ फोडण्याचं होतं. मात्र एका मिनिटांत आम्ही 49 नारळ फोडल आहेत, असं रेड्डी यांनी सांगितलं. याआधीही मार्शिअल आर्टमध्ये राकेश आणि प्रभाकर यांचे बरेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.