Home /News /viral /

हे कसं शक्य आहे? एअरपोर्टवरील ते दृश्य पाहून नेटिझन्स हैराण; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

हे कसं शक्य आहे? एअरपोर्टवरील ते दृश्य पाहून नेटिझन्स हैराण; VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

एअरपोर्टवर चक्क दिसली पळणारी बॅग.

    वॉशिंग्टन, 09 डिसेंबर : सोशल मी़डियावर (Social media) बरेच व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. यापैकी काही इमोशनल असतात तर काही फनी असतात. काही हैराण करणारेही असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात चक्क एक बॅग पळताना (Luggage bag running video) दिसली आहे. एअरपोर्टवरील या बॅगेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एखादी बॅग पडली, आपटली, तुटल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण बॅगेला कधी पळताना पाहिलं का? नाही ना. मग हा व्हिडीओ पाहा. व्हायरल हॉग इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमधील माहितीनुसार हा व्हिडीओ अमेरिकेच्या डलास फोर्ट वर्थ इंटरनॅशनल एयरपोर्टवरील आहे. ज्यामध्ये एक बॅग एअरपोर्ट एकटीच पळताना दिसली. बऱ्याच लोकांनी याचा संदर्भ आपला सामान हरवण्याशी केला आहे. एअरपोर्टवर सामान हरवण्याचं हे एक कारण असू शकतं, असं अनेकांनी म्हटलं आहे. व्हिडीओत पाहू शकता एक बेवारस रोलर सूटकेस विमानतळावर रॅम्पवरील स्वतःच खाली येते आणि ती जणू काही एकटी धावते आहे असंच वाटते. एका सरळ रेषेत ही बॅग जात असते. हे वाचा - ट्रेनपेक्षाही तेज! कुत्र्याचा वेग पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल; पाहा VIDEO रिपोर्टनुसार व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं, की तो DFW आंततराष्ट्रीय विमानतळावर एडमिरल्स क्लबमध्ये बसलो होतो. त्यावेळी एक बॅग ट्रॉलीवरून पडल्याचं मी पाहिलं. रोलर बॅग चाकांवरच उभी राहिली आणि जोपर्यंत ग्राऊंड क्रूने त्या बॅगेला पकडलं नाही तोपर्यंत जवळपास एक मिनिट ती तशीच पळत गेली. हे वाचा - गाडीचा चेंदामेंदा होऊनही वाचला महिलेचा जीव, Photo पाहून वाटेल आश्चर्य व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेकांनसामान गायब होण्याला हेच कारण असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हे खूप मजेशीर, अद्भुत असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Airport, Viral, Viral videos

    पुढील बातम्या