नागपूर, 21 फेब्रुवारी : नवरा-बायकोमध्ये (Huband wife) वादविवाद होतच असतात. पण काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पण तरी घटस्फोटही सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी बरंच काही सिद्ध करावं लागतं, दाम्पत्यालाही विचार करण्यासाठी काही वेळ दिला जातो (Huband wife divorce case). पण एका पतीचं पत्नीसोबतचं कृत्य पाहून कोर्टही हादरलं. नागपूर कोर्टाने ताबडतोब या महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट मंजूर केला.
नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या क्रूरतेची शिकार झालेल्या 22 वर्षीय तरुणीची घटस्फोटाची याचिका मंजूर करत तिच्या हैवान नवऱ्याच्या तावडीतून सुटका केली आहे.
वाडीमध्ये राहणाऱ्या 28 वर्षांचा तरुणाचा वानाडोंगरीतील तरुणीशी 2017 साली लग्न झालं. त्याला दारूचंही व्यसन आहे. या तरुणीने आपल्या नवऱ्याविरोधात कोर्टात धाव घेतली. त्याच्यापासून आपल्याला घटस्फोट मिळावा अशी विनवणी केली.
हे वाचा - 10 वर्षांनी लहान मुलावर विवाहितेचं जडलं प्रेम, पळवून नेत केलं धक्कादायक कृत्य
जेव्हा शारीरिक संबंध बनवायला आपण नकार देतो, तेव्हा नवरा आपले हातपाय बांधून शारीरिक संबंध ठेवतो. आपण ओरडू, किंचाळू नये, यासाठी तिच्या तोंडात कपडा कोंबून ठेवतो, असा आरोप तिने आपल्या पतीवर केला आहे. पहिल्यांदा हे घडलं तेव्हा तरुणीने आपल्या सासूला याबाबत सांगितलं पण पुन्हा असं होणार नाही, याबाबत सासूने आश्वासन दिलं. त्यामुळे ती सासरीच राहू लागली. पण त्यानंतर पतीने पुन्हा अशीचक करत केली. उलट तिच्या नवऱ्याचं वागणं अधिकच बिघडत गेलं. बायकोला माहेरहून पैसे आणायला दबाव टाकायचा, तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तिला मारहाणही करायचा. त्यामुळे तिने घटस्फोटासाठी अर्ज केला.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने तरुणीच्या बाजूने निकाल दिला. तिला घटस्फोट मंजूर केला आहे. लोकमत हिंदीच्या वृत्तानुसार पत्नीचे वकील श्याम आंभोरे यांनी सांगितलं की, पीडित मुलीचं वय खूपच कमी आहे. इतक्या कमी वयात अशी क्रूरता कुणीच सहन करणार नाही. आपल्या पत्नीला आपलं गुलाम समजू नका, हाच संदेश न्यायलयाने या प्रकरणाच्या माध्यमातून दिला आहे.
हे वाचा - भर लग्न मंडपातून नवरदेव वऱ्हाड्यांसह परतला; नवरीसह कुटुंबीयांनाही धक्का
पत्नीला सन्मान देणं, तिच्याशी प्रेमाने वागणं गरजेचं आहे. हिंदू विवाह कायद्यातील 13(1)(ए) नुसार कोर्टात जर एखाद्या व्यक्तीविरोधात त्याच्या जोडीदाराने याचिका दाखल केली आणि त्याची क्रूरता सिद्ध झाली तर कोर्ट घटस्फोट मंजूर करू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.