सहारनपूर, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशभरात हाहाकार पसरला आहे. 12 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प आहे आणि अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर जाण्याची परवानगीही नाही. अशालॉकडाऊन स्थितीत अनेक समस्यांना अडचणींना पोलीस प्रशासन वारंवार धावून आल्याचं पाहायला मिळालं. कधी देवदूत बनून वृद्ध महिलेकडे औषध पोहोचवताना तर कधी गर्भवती महिलेपर्यंत तिच्या आईला पोहोचवताना इतकच नाही तर अनेक भागांमध्ये गरिब आणि मजुरांना खायला देणाऱ्या पोलिसांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या महासंकटात सर्वात पहिला मदतीचा हात पोलिसांनी पुढे केला आहे. घरापासून लांब अहोरात्र कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसांची आणखी एक कामगिरी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एक अनाथ महिलेला दवाखान्यात घेऊन जाण्यापासून ते तिच्या शेवटच्या श्वसापर्यंत तिची काळजी पोलिसांनी घेतली आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पार्थिवाला खांदाही पोलिसांनी दिला.
हे वाचा- ‘मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, ते थेट जाळ काढतात’ उत्तर प्रदेशातील सहारनपूर इथली घटना आहे. बुडगाव शहरातील किशनपुरा गावात राहणाऱ्या एका विधवा महिलेला लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यातच ती आजारी पडली याची माहिती पोलीस पथकाला समजताच त्यांनी महिलेला आपल्या गाडीतून घेऊन जात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांना कुणीही नातेवाईक नसल्यानं त्यांची काळजी पोलीसच घेत होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. त्यावेळी दीपक चौधरी यांनी आपल्या पोलिस साथीदारांसह किशनपूर गावात शोक व्यक्त केला. त्यांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्ययात्रा काढली आणि सोशल डिस्टन्सिंगचं भाग राखून पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. पोलिसांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा- आता 800 मिली रक्त करणार कोरोनावर उपचार, भारतात लवकरच होणार ‘या’ थेरपीचा वापर