मुंबई, 24 जुलै : पलामूच्या डाल्टनगंज येथील मेदिनी राय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. ही घटना गेल्या शनिवारची आहे. यामध्ये एका व्यक्तीने सापाला गोणीत बंद केलं आणि त्याला घेऊन हॉस्पिटल गाठले. ते पाहून तेथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी ही चक्रावले. या संपूर्ण प्रकरणामागील कारण म्हणजे रेहला येथील गोदरामा गावात एका घरात साप घुसला होता आणि लोकांनी साप पकडण्यासाठी स्नेक कॅचरला बोलावले होते. तो आल्यावर त्याने साप पकडला, मात्र त्या वेळी स्नॅक कॅचरला साप चावला. त्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ मेदिनी राय मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. बापरे! सापने दंश केला म्हणून तरुणाने चावला सापाचा फणा, नक्की हे प्रकरण काय? या प्रकरणात ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा या स्नॅक कॅचरच्या मुलाने आपल्या वडिलांना दंश करणारा साप पकडला आणि नंतर त्याला गोणीत भरून रुग्णालयात आणले. त्याने असे केले कारण या सापाला ओळखून त्याच्या वडिलांवर उपचार करणं जास्त सोपं होऊ शकतं. विषारी कोब्रा म्हणून या सापाची ओळख पटली, त्यानंतर या जखमीवर उपचार सुरू आहेत. या घटनेने इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपस्थित डॉक्टरांसह इतर लोकही हादरले. त्यानंतर पोलीस आणि वनविभागाने सापाला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले. खरंतर सर्पदंशानंतर जेव्हा त्या व्यक्तीला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांनी दाखल केले तेव्हा त्या व्यक्तीच्या मुलाने सांगितले की, त्याने सापही गोणीत घेऊन आणला होता. ते पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आणि विचारात पडले. असे का केले असवे? त्यावर त्याने योग्य आणि त्वरीत उपचार व्हावे असा हेतू असल्याचं सांगितलं. या अशा विचित्र प्रकारामुळे संपूर्ण प्रकरण चर्चेचा विषय ठरलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.