मराठी बातम्या /बातम्या /Viral /उड्डाण करताच घराच्या छतावर कोसळलं विमान; काळजाचा ठोका चुकवणारा Live Video

उड्डाण करताच घराच्या छतावर कोसळलं विमान; काळजाचा ठोका चुकवणारा Live Video

बरवड्डा हवाई पट्टीवरून उड्डाण केल्यानंतर ग्लायडर उडत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. यानंतर ग्लायडर अनियंत्रित होऊन बिरसा मुंडा पार्कजवळील नीलेश कुमार यांच्या घरावर पडलं.

बरवड्डा हवाई पट्टीवरून उड्डाण केल्यानंतर ग्लायडर उडत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. यानंतर ग्लायडर अनियंत्रित होऊन बिरसा मुंडा पार्कजवळील नीलेश कुमार यांच्या घरावर पडलं.

बरवड्डा हवाई पट्टीवरून उड्डाण केल्यानंतर ग्लायडर उडत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. यानंतर ग्लायडर अनियंत्रित होऊन बिरसा मुंडा पार्कजवळील नीलेश कुमार यांच्या घरावर पडलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jharkhand, India

रांची 24 मार्च : झारखंडच्या धनबादमध्ये गुरुवारी जॉयराइड ग्लायडर कोसळून घराच्या छतावर पडल्याने मोठी दुर्घटना घडली. धनबाद शहरातून कोयलांचलचा हवाई दौरा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. बरवड्डा हवाई पट्टीवरून उड्डाण केल्यानंतर ग्लायडर विमान उडत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. यानंतर ग्लायडर विमान अनियंत्रित होऊन बिरसा मुंडा पार्कजवळील नीलेश कुमार यांच्या घरावर पडलं.

स्कूल बस चालवतानाच चालकाला आला Heart Attack; 13 वर्षीय मुलाने असा वाचवला सगळ्यांचा जीव..VIDEO

या अपघातात ग्लायडरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, यादरम्यान त्याचा पायलट आणि ग्लायडरमधील आणखी एक तरुण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांचा मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला.

मागील काही काळापासून ग्लायडरद्वारे धनबाद शहराचा हवाई दौरा केला जात आहे. याच दरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे ग्लायडर अचानक अनियंत्रित होऊन बरवड्डा विमानतळापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर कोसळलं. बरवड्डा पोलीस स्टेशनचे एएसआय एसके मंडल म्हणाले, 'बिरसा मुंडाजवळ एक ग्लायडर कोसळल्याची पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. घटनास्थळी पोलीस तैनात असून दोन जण जखमी झाले आहेत. अधिक तपास सुरू आहे. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा संपूर्ण कुटुंब घराबाहेर होतं आणि लहान मुलंही बाहेर खेळत होती.

पाटणा येथील रहिवासी कुश सिंग (१४) असे जखमी प्रवाशाचे नाव असून तो धनबाद येथील आपले मामा पवन सिंग यांच्या घरी आला होता. कुश सिंग एका खाजगी एजन्सीद्वारे चालवल्या जाणाऱ्या जॉयराइड ग्लायडरमध्ये बसला होता. उड्डाणानंतर लगेचच ग्लायडर निलेश कुमार यांच्या घरावर पडलं, परंतु घरातील कोणालाही दुखापत झाली नाही.

First published:
top videos

    Tags: Airplane, Shocking video viral