मुंबई, 05 फेब्रुवारी : मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असं कायम म्हटलं जातं. मुली सर्वात जास्त लाडक्या असतात त्या त्यांच्या वडिलांच्या. त्यामुळे आता मुलींना पापा की परी असंही म्हटलं जातं. बहुतेक मुलींचंही सर्वात जास्त प्रेम हे आपल्या वडिलांवरच असतं. वडिलांवर असंच जीवापाड प्रेम करणाऱ्या एका लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बापासाठी तिची तळमळ पाहून सर्वजण भावुक झाले आहेत. हा एवढ्याशा चिमुकलीने सोशल मीडियावर आसवांचा जणू पूरच आणला आहे (Girl crying for father video). आता पूर्वीप्रमाणे मुलामुलींमध्ये भेदभाव केला जात नाही. वंशाला दिवा हवा याऐवजी आता आम्हाला घरात लक्ष्मी हवी असा हट्ट बहुतेक कुटुंबाचा असतो. आपल्याला एक गोड मुलगी हवी असं स्वप्नं अनेक दाम्पत्य पाहतात. पण काही लोक असेही आहेत ज्यांना आजही मुलगी म्हणजे ओझं वाटतं. मुलगी नकोशी वाटते. मुलीचा जन्म होताच ते निराश होतात. पण मुलींबाबत दगडाचं काळीज असलेल्या अशा लोकांना पाझर फुटेल असा हा व्हिडीओ आहे. कदाचित हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नकोशी वाटणारी मुलगीही त्यांना हवीहवीशी वाटेल. हे वाचा - VIDEO - स्टेजवर फ्रेंड्सनी केलं असं काही की नवरदेवाला मिठी मारत ढसाढसा रडली नवरी 2 मिनिटं 14 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत ही छोटीशी गोड मुलगी रडताना दिसते आहे. तिच्या रडण्याचं कारण आहे तिचे वडील. ती आपल्या वडिलांसाठी ढसाढसा रडते आहे. आई तिला तिच्या रडण्याचं कारण विचारते तेव्हा ती आपल्याला आपल्या वडीलांची आठवण येत असल्याचं सांगते. यानंतर मुलगी पुढे जे काही बोलते ते ऐकूण तुमच्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
पापा की इतनी फिक्र "ये होती है. बेटीयां" जिन लोगों को बेटीयां बोझ लगती वो एक वार वीडियो जरूर देख ले.@chitraaum @pankajjha_ @manojmuntashir pic.twitter.com/SxOfVfyLv4
— Journalist Navin Raghuvanshi (@RaghuvanshiLive) February 4, 2022
मुलगी म्हणते, “बाबा दिवसभर काहीही न खातापिताच काम करतात. दिवसभर फक्त काम काम काम… फक्त सकाळी जेवून जातात. संध्याकाळी काही खात नाहीत. रात्री येऊनच जेवतात. मला त्यांची चिंता वाटते” बाबांसाठी ती आईशीही वाद घालताना दिसते. आई तिला समजावते मी तुझ्या वडिलांची काळजी घेते, त्यांना खायला देते. तरी मुलगी तिचं काहीएक ऐकायला तयार नाही. ती आपली रडतच राहते. हे वाचा - Shocking! 13 फूट मगरीवर व्यक्तीने मारला ताव; शिकारीनंतर खाल्लं 400 किलो मांस @RaghuvanshiLive ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स भावुक झाले आहेत.