फ्लोरिडा, 05 फेब्रुवारी : आतापर्यंत मगरीच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. अगदी भल्याभल्या प्राण्यांचीही मगर किती हुशारीने शिकार करते. एकाच नेमात ती आपला डाव साधते. एकदा का तिच्या जबड्यात कुणी सापडलं की त्याची सुटका जवळपास नाहीच. या मगरीला तुम्ही अनेकांची शिकार त्यांना गिळंकृत करताना पाहिलं असेल, पण आता तर चक्क एका माणसाने मगरीशी शिकार करून तिला खाल्लं आहे (Man eat crocodile). फ्लोरिडातील ही धक्कादायक घटना आहे (Florida crocodile hunting). फ्लोरिडातल्या ओकीचोबी काऊंटीत एका तलावात गेल्या 80 वर्षांपासून ही अवाढव्य मगर राहत होती. ग्रामस्थ या मगरीच्या दहशतीत होते. माणसं, प्राण्यांवर ही मगर हल्ला करत होती. या तलावाजवळ राहणाऱ्या व्यक्तीचे पाळीव प्राणी अचानक गायब होऊ लागले. ही मगरच त्या प्राण्यांना खात असावी असा संशय त्याला होता. त्याने आपल्या प्राण्यांवर नजर ठेवली आणि त्याचा संशय खरा ठरला. अखेर ग्रामस्थांनी मगरीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका प्रोफेशनल शिकाऱ्याची मदत घेतली. तलावाजवळ राहणाऱ्या या व्यक्तीने प्रोफेशनल हंटर डॉग बोर्रिसशी संपर्क केला. तो मगरीची शिकार करायला आले. हे वाचा - So cute म्हणत गेंड्यांना मिठीत घेऊन किस करायला गेली आणि…; पुढे काय घडलं पाहा डॉगने सांगितलं, त्याने दिवसाच या मगरीची शिकार केली. तलावामध्ये असलेल्या एका छोट्याशा आयलँडमध्ये ही मगर दिसली तेव्हाच तिची शिकार केली. त्याने यासाठी रायफल वापरली. 321 यार्ड लांबून त्याने गोळी चालवली. शिकार केल्यानंतर डॉगने मगरीला हातात घेऊन तिचा आकार पाहिला. ती इतकी मोठी असावी याची कल्पनाही त्याने केली नव्हती. तब्बल 13 फूट लांब आणि 406 किलो वजनाची ही मगर होती. डॉगने या मगरीचा फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये मगरीला पाहूनच आपल्याला धडकी भरते. हे वाचा - धक्कादायक! शार्क टँकमध्ये मांस फेकत होती महिला; तोल जाताच पाण्यात कोसळली अन्… धक्कादायक म्हणजे मगरीची शिकार केल्यानंतर डॉगचं काम तिथंच संपलं नाही तर त्याने यानंतर पार्टी केली. ज्या भल्यामोठ्या मगरीची त्याने शिकार केली होती, त्याच मगरीवर त्याने ताव मारला. तया मगरीची त्वचा वेगळी केली आणि तिचं मांस काढून ते शिजवून खाल्लं. आपल्या शिकारीचा त्याने पुरेपूर आनंद लुटला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.