मुंबई, 05 फेब्रुवारी : लग्न म्हटलं की मजामस्ती आलीच (Wedding video). विशषेतः नवरा-नवरीचे मित्रमैत्रिणी त्यांना त्रास देण्याची, चिडवण्याची, त्यांची खिल्ली उडवण्याची एक संधी सोडत नाहीत (Bride groom friends). सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात फ्रेंड्सनी स्टेजवर असं काही केलं की नवरीबाईला रड़ूच कोसळलं. तिने नवरदेवाला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली (Bride crying video). आपलं लग्न हटके व्हावं, सर्वांच्या लक्षात राहावं यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जितका नवरा-नवरीचा असतो तितकाच त्यांच्या मित्रमैत्रिणींचाही असतो. त्यामुळे लग्नात ते काही ना काही तरी सरप्राईझ देतात. असंच सरप्राईझ या नवरा-नवरीलाही त्यांच्या फ्रेंड्सकडून मिळालं. जे नवरा-नवरीला आयुष्यभर लक्षात राहिल. बऱ्याच लग्नात तुम्ही पाहिलं असेल की सामान्यपणे नवरा-नवरीला स्पेश फिल करवण्यासाठी मित्रमैत्रिणी गाणं गातात किंवा डान्स करतात. अशाच एका कपलचे फ्रेंड्सच त्यांच्या लग्नाच्या संगीत सेरेमेनीला काही परफॉर्म करताना दिसले. हे वाचा - VIDEO - मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून लाजली नवरी; नेटिझन्स म्हणाले, ‘काम की चीज’ व्हिडीओत तुम्ही पाहू शकता स्टेजवर काही तरुण तरुणी आहेत. स्टेजवर येताच मेरा तो यार है हिरा गाण्यावर ते डान्स करताना दिसतात. महत्त्वाचं म्हणजे हे गाणं ते स्वतः गातात आणि त्यावर जबरदस्त हावभाव करत स्टेप्स करतात.
नवरा-नवरी दोघांसाठीही हे खूप मोठं सरप्राइझ असतं. नवरीबाई हे पाहून इतकी इमोशनल होते हे तिचे डोळे अश्रूंनी भरतात. ती आपले अश्रू आवरूही शकत नाही. नवरदेवाला घट्ट मिठी मारते आणि त्याच्या कुशीत जाऊन ती ढसाढसा रडताना दिसते. त्यानंतर ते दोघंही आपल्या मित्रमैत्रिणींसमोर हात जोडत त्यांचे आभार मानतात. हे वाचा - लग्नात नवरीला पाहून नवरदेव Out of Control, असं काही केलं…पाहा VIDEO ब्राइड्स स्पेशल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.