मुंबई, 09 एप्रिल : लहान मुलां ना नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची, करून पाहण्याची उत्सुकता असते. त्यांना यात का धोका आहे, त्याचे काय दुष्परिणाम आहेत याची माहिती नसते. बऱ्याचदा मुलं पालकांची नजर चुकवून नको तेच करून बसतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच धडकी भरेल. दोन गगनचुंबी इमारतींच्या छतावर चिमुकले जीवघेणा खेळ खेळताना दिसले. लहान मुलांचा हा भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला असेल. दोन उंच इमारतींवर लहान मुलं खतरनाक स्टंट करताना दिसले. तसं तुम्ही काही तरुणांना उंच इमारतींवर स्टंट करताना पाहिलं असेल. असे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. हे व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते. पण या व्हिडीओत मात्र असे जीवघेणे स्टंट कुणी तरुण नाही तर चिमुकला मुलगा करतो आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता उंच इमारतींच्या छतावर दोन लहान मुलं दिसत आहेत. दोन्ही मुलं दहा वर्षांच्या आत असलेली दिसतात. त्यापैकी एक लहान आणि एक मोठा आहे. एक मुलगा एका इमारतीवर तर दुसरा दुसऱ्या इमारतीवर उभा आहे. बिल्डिंग किती उंच आहे हेसुद्धा या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. उंची पाहूनच आपल्याला चक्कर येते. अशाच इमारतीवर ही दोन्ही मुलं आहेत. VIDEO - ‘पप्पा मम्माला मारू नका’, प्रेमाने सांगूनही ऐकले नाही; शेवटी संतप्त लेकीने चिमुकल्या हातांनी वडिलांना… मोठा मुलगा एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उडी मारतो. तेव्हाच आपल्या हृदयाची धडधड वाढते. सुदैवाने तो दुसऱ्या बिल्डिंगच्या छतावर सुखरूप पोहोचतो. तेव्हा कुठे आपल्या जीवात जीव येतो. पण हा मुलगा पुन्हा त्या आधीच्या बिल्डिंगवर उडी मारतो. तेव्हासुद्धा तो सुखरूप पोहोचतो. एकदा झालं, दोनदा झालं. एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर आपण उडी मारू शकतो, हे या मुलाला लक्षात आल्यानंतर त्यालाही अधिक जोश चढतो. तिसऱ्यांदाही तो तसंच करतो. या बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगवरून कदाचित कुणीतरी हे भयानक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय तरुणाची उंच इमारतीवरुन उडी अन्.., थरकाप उडवणारा VIDEO सुदैवाने या व्हिडीओत तरी मुलाला काही झालेलं दिसत नाही आहे. पण जर त्याचा पाय थोडा जरी सरकला असता तरी भयंकर घडलं असतं.
त्यामुळे पालकांनो तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष असू द्या. मुलं बाहेर खेळत असतील असं म्हणून समाधानी राहणं सोडा. बाहेर ते काय खेळत आहेत, यावरही लक्ष ठेवा.