• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • रस्ता ओलांडत होता चिमुकला, इतक्यात भरधाव वेगात आला ट्रक आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

रस्ता ओलांडत होता चिमुकला, इतक्यात भरधाव वेगात आला ट्रक आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये (Video) पाहायला मिळतं, की रस्त्याच्या कडेला दोन लहान मुलं उभी आहेत. दोघंही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात समोरून एक ट्रक भरधाव वेगात तिथे येतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 29 जून : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ (Viral on Social Media) सतत व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अतिशय मजेशीर (Funny Video) असतात, काही व्हिडिओ तुम्हाला भावुक (Emotional Video) करतात तर काही व्हिडिओ पाहून अंगावर काटा (Shocking Video) येतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही. कारण, या व्हिडिओमध्ये एक अत्यंत मोठी दुर्घटना टळलेली (Accident Video) पाहायला मिळते. मामाच्या घरात राहणाऱ्या भाचाच्या प्रेमात पडली मामी; दोघांच्य लग्नाचा VIDEO VIRAL अपघातांचे अनेक व्हिडिओ आजवर तुम्ही पाहिले असतील. अनेक व्हिडिओ तर असे असतात ज्यात लोक मरणाच्या दारातून परत आल्याचं पाहायला मिळतं. अशा प्रकारच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते आणि अशा घटनांमधून वाचलेल्या लोकांचं नेटकरी कौतुकही करतात, तसंच हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही केले जातात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही तुम्हाला असंच काही पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं, की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा अधिक श्रेष्ठ असतो. या व्हिडिओमध्ये दिसतं, की ट्रक चालक कशाप्रकारे एका चिमुकल्याचा जीव वाचवतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की रस्त्याच्या कडेला दोन लहान मुलं उभी आहेत. दोघंही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात समोरून एक ट्रक भरधाव वेगात तिथे येतो. ट्रक पाहून एक चिमुकली तर थांबते पण दुसरा मुलगा मात्र पुढे चालतच राहातो. मात्र, या मुलापर्यंत पोहोचेपर्यंत ट्रक चालकानं ज्याप्रकारे ब्रेक लगावला, तो कौतुकास्पद होता.
  VIDEO : भररस्त्यात अर्भकाला दिला जन्म, नंतर नाल्यात फेकलं; CCTV मध्ये कैद व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजलं असेल, की कशाप्रकारे ट्रक चालकाच्या तप्तरतेमुळे एका चिमुकल्या जीव वाचला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘jatt.life’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या मुलाचं नशीब खूपच चांगलं असल्याचं अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: