नवी दिल्ली, 12 एप्रिल : अनेक लोकांना प्राण्यांच्या संबंधित व्हिडीओ पहायला खूप आवडतात. एवढंच नाही तर त्यांचं जीवन आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी अनेक लोक जंगल सफारीवरही जातात. मात्र दूरुन छान वाटणारे प्राणी जवळून भयानक आणि भीतीदायक वाटतात. कधी कोणावर हल्ला करतील काही सांगता येत नाही. जंगल सफारीदरम्यान तर अशा घटना अधिक पहायला मिळतात. जंगल सफारी दरम्यानचा सिंहांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जंगलातील सिंहांनी पर्यटकांचा रस्ता अडवल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून अनेकांचं लक्ष वेधत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्य तुम्ही पाहू शकता, जंगल सफारीला आलेल्या पर्यटकांचा रस्ता अडवून सिंह रस्त्याच्या मध्यभागी झोपले आहेत. ज्यामुळे पर्यटकांना पुढे जायला अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटक गाड्या घेऊन तसेच थांबले आहेत. पर्यटक श्वास रोखून उभे असलेला हा व्हिडीओ @buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सिंहांची चांगलीच दहशत दिसत आहे.
सिंहाचा हा व्हिडिओ शेअर करताच इंटरनेटवर तुफान व्हायरल झालेला पहायला मिळाला. टांझानिया जंगलातील हा व्हिडीओ असून व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला मिळत आहे. वेगवेगळ्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत शिवाय नेटकरी व्हिडीओला लाईकही करत आहेत. हेही वाचा - मध्यरात्री चालकाशिवाय सुरु झाली रिक्षा, Video धडकी भरवणारा सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जंगलातील भयानक प्राण्यांचे हल्ल्याचे व्हिडीओदेखील इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक पाहिले जातात.

)







